चंदीगडHaryana 100 Crore Scam :हरियाणा सहकार विभागातील 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात एसीबीनं आता प्रकल्पाचे नोडल अधिकारी नरेश गोयल यांच्यासह अन्य राजपत्रित अधिकारी, तत्कालीन सहायक निबंधक यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. याआरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी तपास पथकानं राज्य सरकारकडं परवानगी मागितली आहे. यासंबंधीची फाईल सध्या हरियाणाच्या मुख्य सचिवांकडं पाठवण्यात आली आहे.
यांनी केला 100 कोंटींचा घोटाळा :शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या आरोपींवर कायदेशीर कारवाई होणार आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपींमध्ये तत्कालीन आयसीडीपी रेवाडी, महाव्यवस्थापक, सहकारी संस्थांचे सहायक निबंधक अनु कौशिक यांच्यासह आरोपी स्टॅलिन जीत, बेनब्रिज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, बंटम ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड, बंटम इंडिया लिमिटेड, लोडलिंक सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड तसंच लेबे इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे.
- आरोपींचा परदेशात पळून जाण्याचा कट :तपासात हे आरोपी सरकारी पैसे गोळा करून परदेशात पळून जाण्याचा कट रचत असल्याचं समोर आलं आहे. मात्र त्यापूर्वीच तपास पथकाला याची माहिती मिळाली आहे.
दाखवलं खोटं बिल : फर्म PACS च्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 32.13 लाख रुपयांचं खोटं बिल दाखवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात ही सर्व देयके बनावट बिलाच्या आधारे करण्यात आली. याशिवाय, सीसीटीव्ही कॅमेरे, लॅ पटॉपसाठी लेब इंडियाला PACS साठी 24.82 लाख रुपये देण्यात आले होते. लोडलिंक सिस्टमला संगणकसह प्रिंटरसाठी 10.97 लाख रुपये मिळाले आहेत. बँटम इंडिया, लेबे इंडिया, लोडलिंक सिस्टम आणि बेनब्रिज कन्स्ट्रक्शन यांच्याकडून त्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण 55.30 लाख रुपये मिळाले आहेत.
- मंजूरीशिवाय फर्मला दिलं 15 लाख रुपये : घोटाळ्यासाठी, विजय सिंह यांचं नियमांचं उल्लंघन करून विकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या फर्म सरल कोऑपरेटिव्हला 15 लाख रुपये देण्यात आले होते. या घोटाळ्यात परवानगी न घेता बचत गटांना लाखोंची रक्कम दिल्याचं आढळून आलंय.
शिपाई बनला लक्षाधीश : एसीबीच्या तपासात असं समोर आलं की, कंत्राटी शिपाई नरेंद्र सिंग यानं अनु कौशिशच्या संगनमतानं 2019 ते 2022 या काळात बेकायदेशीरपणे 8.23 लाख रुपये मिळवले. याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांच्या नावानं उघडलेल्या मानव उत्थान सोसायटीत 3.60 लाख रुपये सापडले आहेत. नियमांचं उल्लंघन करून त्यांनी 21.94 कोटी रुपयांच्या एफडी वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा करून त्यावरील व्याज हडप केलंय.
अपार्टमेंट खरेदीसाठी आयसीडीपी खात्यातून रक्कम हस्तांतरित :2023 मध्ये गुरुग्राममध्ये नोंदवलेल्या एफआयआर क्रमांक 22 आणि 23 नुसार, एसीबीच्या तपास पथकानं एसआरके अपार्टमेंट, झिरकपूरमध्ये फ्लॅट खरेदी करण्यासाठी आयसीडीपी रेवाडीच्या बँकेत पैसे जमा केले होते. गे पैसे ICDP योगेंद्र अग्रवाल यांच्या नावार 43.8 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचं आढळलं होतं. हे पेमेंट 2018 मध्ये करण्यात आलं होतं. यामध्ये लेखापाल सुमित अग्रवाल, विकास अधिकारी नितीन शर्मा यांचाही समावेश होता. तर 2019 मध्ये नितीन शर्मा आणि योगेंद्र अग्रवाल यांच्या पत्नी रचना अग्रवाल यांच्या नावावर SRK अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी करण्यासाठी ICDP कडून 45.50 लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले होते.
मुख्य आरोपीनं 4 कोटी रुपये काढले : गुरुग्राममध्ये नोंदवलेल्या एफआयआर क्रमांक 29 नुसार, ICDP कालावधी संपल्यानंतर, मुख्य आरोपी अनु कौशीशनं चार कोटी रुपये काढून घेतलं होते. त्यानंतर ही रक्कम वेगवेगळ्या लोकांकडं वर्ग करण्यात आली. त्यापैकी 54.60 लाख रुपये कौशिक कुटुंबीयांना परत करण्यात आलं. तसंच कौशिकसाठी सिरसा येथे 1.22 कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्यात आली होती. याशिवाय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राम कुमार यांना कुरुक्षेत्रातील भूखंड खरेदीसाठी 60 लाख रुपये, स्टॅलिन यांची पहिली पत्नी पूनम यांना 28.93 लाख रुपये, दुसरी पत्नी कंवलजीत यांना 50 लाख रुपये, जागो प्रिंटिंग प्रेसला 50 लाख रुपये तसंच बेनब्रिज कन्स्ट्रक्शनला 45 लाख रुपये देण्यात आले होते. ४५ लाख रुपये मिळाले.
आतापर्यंत १४ जणांना अटक :हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर 2022 मध्ये एसीबीनं मे 2023 मध्ये चार राजपत्रित अधिकाऱ्यांना अटक केली होती. या घोटाळ्यात आतापर्यंत एकूण 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये लेखापरीक्षण अधिकारी बलविंदर, उपमुख्य संपादक योगेंद्र अग्रवाल, जिल्हा निबंधक सहकारी संस्था कर्नल रोहित गुप्ता, सहायक निबंधक सहकारी संस्था (ARCS) अनु कौशिक, रामकुमार, जितेंद्र कौशिक आणि कृष्णा बेनिवाल यांचा समावेश आहे. याशिवाय लेखापाल सुमित अग्रवाल, विकास अधिकारी नितीन शर्मा आणि विजय सिंह आणि त्याच विभागातील चार खासगी व्यक्ती स्टॅलिन जीत, नताशा कौशिक, सुभाष आणि रेखा यांना अटक करण्यात आली आहे.
- आतापर्यंत 10 एफआयआर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची टीम 2022 पासून सहकार खात्याच्या या घोटाळ्याची चौकशी करत आहे. तपास पथकानं या संदर्भात गुरुग्रामसह अंबाला, कर्नाल रेंजमध्ये आतापर्यंत दहा एफआयआर नोंदवले आहेत. हरियाणाचे डीजीपी शत्रुजित कपूर यांनी भ्रष्टाचाराच्या एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही, असा कडक इशारा दिला आहे.
हे वाचलंत का :
- एवढे दिवस वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका; अजित पवारांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन
- पंतप्रधानांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन होण्यापूर्वी आदित्य ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल, काय केला आरोप?
- अरविंद केजरीवालनंतर गुन्हे शाखेचे पथक पोहोचले आतिशींच्या घरी, आमदारांच्या घोडेबाजारप्रकरणी बजावणार नोटीस