जैसलमेर (जयपूर) - राजस्थानमधील जैसलमेर शहरात शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषद झाली. या बैठकीला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विविध राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित राहीले. बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद परिषेदत जीएसटीबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.
जीएसटी परिषदेनं कोणते बदल सूचविले?
- जीएसटी परिषदेत पॉपकॉर्नवर तीन प्रकारचे कर प्रस्तावित करण्यात आले. प्रथम, प्री-पॅक न केलेले, मीठ आणि मसाले मिसळून तयार पॉपकॉर्नवर ५ टक्के जीएसटी लावण्याचे सुचवण्यात आले आहे. प्री-पॅक केलेल्या आणि लेबल केलेल्या पॉपकॉर्नवर 12 टक्के जीएसटी लागेल. तर कॅरामल पॉपकॉर्नवर 18 टक्के कर लागेल. साध्या आणि केवळ खारट पॉपकॉर्नवर जीएसटी लागू होणार नाही.
- फोर्टिफाईड तांदळावरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तांदळाचे दर कमी होण्याची शक्यता आहे
- शेतकऱ्यांनी काळी मिरी आणि बेदाणे विकले तर त्यावर जीएसटी लागू होत नाही. मात्र, या वस्तू व्यापाऱ्यांनी विकल्या तर त्यांना कर भरावा लागणार आहे.
- सॉफ्टवेअरसह एसएएम क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या सर्व सुट्ट्या भागांवर जीएसटीमधून सूट दिली जाईल.
- 2,000 रुपयांपेक्षा कमी व्यवहार करणारे पेमेंट एग्रीगेटर सुटसाठी पात्र आहेत. परंतु हे पेमेंट गेटवे आणि फिनटेक सेवांना लागू होणार नाही.
- कर्जदारांद्वारे कर्जाच्या अटींचे पालन न केल्याबद्दल बँका आणि NBFCs द्वारे वसूल केलेल्या दंडात्मक शुल्कांवर कोणताही जीएसटी लागू नाही.
- 50 टक्क्यांपेक्षा जास्त फ्लाय अॅश असलेल्या एसीसी ब्लॉक्सवर 12 टक्के जीएसटी लागू होईल,
कशामुळे पॉपकॉर्नवर वेगवेगळे दर-कॅरामलाइज्ड पॉपकॉर्नवरील कर १८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. याचे कारण स्पष्ट करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, "ही कार्बोनेटेड पेयेसारखी वेगळी श्रेणी आहे. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे ते उच्च कराच्या स्लॅबमध्ये ठेवले आहे. खारट आणि साधे पॉपकॉर्नही बाजारात विकले जात आहेत. त्यावर जीएसटी वाढविण्यात आलेला नाही".