महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'जेएनयु'च्या सेंटरमध्ये मध्यरात्री 'लेफ्ट-राइट' राडा; अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी - JNU

Fight between students in JNU : गुरुवारी रात्री जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झालीय. भाषा विभागात निवडणूक समिती सदस्यांच्या निवडीसाठी सर्वसाधारण सभा सुरू असताना ही घटना घडली. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Fight between students in JNU
Fight between students in JNU

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 2:09 PM IST

'जेएनयु'त मध्यरात्री पुन्हा राडा

नवी दिल्ली Fight between students in JNU : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना समोर आलीय. गुरुवारी रात्री निवडणूक समिती सदस्यांच्या निवडीसाठी भाषा विभागात सर्वसाधारण सभा सुरु होती. या बैठकीदरम्यान डाव्या पक्षांनी अभाविपच्या उमेदवाराला मंचावरुन बोलू दिलं नाही, असं सांगण्यात येत आहे. यावरुन विद्यार्थ्यांच्या गटात बाचाबाची होऊन डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या घटनेत अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले आहेत.

दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांचे एकमेकांवर आरोप :डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी याला अभाविपच्या विद्यार्थ्यांची गुंडगिरी म्हटलंय. तसंच अभाविपच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर लाठीमार केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केलाय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित विद्यार्थ्यांनी याला डाव्या विचारसरणीचा हल्ला म्हटलंय. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यात विद्यार्थी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : रात्री घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी कसा हल्ला करताना दिसत आहेत. काही वेळातच हे प्रकरण चिघळलं. व्हिडिओत एक व्यक्ती विद्यार्थ्यांवर सायकल फेकताना दिसत आहे. त्याचवेळी विद्यापीठातील सुरक्षा कर्मचारीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

अनेक विद्यार्थी जखमी : याप्रकरणी दोन्ही पक्षांच्या तक्रारी आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तक्रारींची चौकशी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयातही दाखल करण्यात आलंय. सध्या जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्याअंतर्गत सर्व शाळांमध्ये एक-एक करुन सर्वसाधारण सभा आयोजित केल्या जात आहेत. त्यादरम्यान हा राडा झालाय.

हेही वाचा :

  1. The kerala story : द केरळ स्टोरीचे देशात पहिले स्क्रिनिंग जेएनयूमध्ये! मिळाला मोठा प्रतिसाद
  2. BBC Documentary On Modi : जेएनयूत पंतप्रधानांवरील डॉक्युमेंट्री स्क्रीनिंग असताना वीजपुरवठा खंडित, विद्यार्थ्यांची प्रशासनाविरोधात निदर्शने
  3. JNU Hate Slogans Case: जेएनयूच्या भिंतींवर हिंदू रक्षा दलाने लिहिले द्वेषपूर्ण नारे ; केली घोषणाबाजी

ABOUT THE AUTHOR

...view details