चंदीगडFarmer Died On Khanuri Border :शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे.हरियाणा सरकारनं पंजाबच्या शंभू, खानूरी, डब्बवली सीमेवर शेतकऱ्यांना रोखल्यामुळं वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. तसंच अश्रुधुरामुळं अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. खानूरी सीमेवर शेतकरी दर्शन सिंग यांची प्रकृती अश्रूधुरामुळं खालावल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. त्यानंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
खनौरी सीमेवर तिघांचा मृत्यू : खनौरी सीमेवर आतापर्यंतचा हा तिसरा मृत्यू आहे. यापूर्वी 14 फेब्रुवारी रोजी मनजीत सिंग नावाच्या वृद्ध शेतकऱ्यालाही हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर 21 फेब्रुवारीला शुभकरन नावाच्या तरुणाचा हरियाणा पोलिसांनी गोळी झाडल्यानं मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. तसंच 22 फेब्रुवारीच्या रात्री दर्शन सिंह (60) नावाच्या वृद्ध शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
अश्रुधुरामुळं तब्येत खालावली : या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, खानुरी सीमेवर रात्री उशिरा शेतकरी आंदोलनादरम्यान भटिंडा जिल्ह्यातील अमरगड गावाजवळील गोनेयना येथील शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. मयत शेतकरी दर्शन सिंह हे अंदाजे (60) वर्षांचे असल्याचं सांगण्यात येत आहे. हरियाणा पोलिसांनी गोळीबार केलेल्या अश्रूधुरांमुळं या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. अश्रूधुराच्या नळकांड्यामुळं प्रकृती खालावल्यानं शेतकरी दर्शनसिंग यांना उपचारासाठी पाथर येथे नेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तेथून त्यांना शासकीय राजिंद्र रुग्णालयात हलवलं असता त्यांचा मृत्यू झाला. यासोबतच दर्शन सिंग यांच्यावर आठ लाख रुपयांचं कर्ज असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळं या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचा सरकारनं मदत करावी, असं आवाहन शेतकरी नेत्यांनी केली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यालाही बेदम मारहाण -शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हिस्सारच्या खेडी चौपाट्यावर तणावाची आहे. शेतकऱ्यांच्या निदर्शनादरम्यान काही हल्लेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्याकरिता अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. पोलिसांनी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतलं आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यालाही बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. वास्तविक, खनौरी सीमेकडे मोर्चा काढण्यासाठी शेतकरी खेडी चौपाटा येथे जमले होते. मात्र, घोषणाबाजीनं परिस्थिती बिघडली आहे.
हे वाचलंत का :
- शेतकरी आंदोलकांच्या हल्ल्यात 12 जवान जखमी, एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा
- सरकारबरोबर चर्चेची चौथी फेरीही निष्फळ; शेतकरी 21 फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करणार
- शेतकऱ्यांबरोबर चर्चेची चौथी फेरी संपन्न, केंद्र सरकारची भूमिका काय? जाणून घ्या