महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू, शंभू सीमेवरील दुर्दैवी घटना - शेतकरी आंदोलन

Farmer Protest : हरियाणा पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शंभू सीमेवर रोखलं आहे. शुक्रवारी सकाळी एका वृद्ध शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.

Farmer Protest
Farmer Protest

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 12:38 PM IST

Updated : Feb 16, 2024, 2:43 PM IST

नवी दिल्ली Farmer Protest : शेतकरी आंदोलनात हरियाणातील शंभू सीमेवर एका 70 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याला आंदोलनादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. हा शेतकरी पंजाबमधील गुरुदासपूरचा रहिवासी होता.

हृदयविकाराचा झटका आला : हरियाणा पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शंभू सीमेवर रोखलं आहे. सध्या शेतकरी तेथे तळ ठोकून आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर शेतकऱ्याला राजपुरा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयानं सांगितलं की, वृद्ध शेतकऱ्याला हृदयविकाराचा जोरदार झटका आला होता. रुग्णालयात आणलं असता त्याची प्रकृती चिंताजनक होती. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

देशव्यापी 'भारत बंद' : शेतकरी संघटनांनी आज देशव्यापी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या बंदचा संमिश्र परिणाम देशभरात पाहायला मिळतोय. शेतकरी आणि सरकार यांच्यातील तिसरी मॅरेथॉन बैठक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. बैठकीनंतर अनेक मागण्यांवर एकमत झालेलं नाही. त्यामुळे आता शेतकरी मागे हटायला तयार नाहीत. येत्या रविवारी सरकार आणि शेतकरी यांच्यात चौथ्या टप्प्यातील बैठक होणार आहे. या बैठकीत काहीतरी तोडगा निघेल, अशी आशा आहे.

बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना रोखलं : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा आणि पंजाबची सीमा सील करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीतही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हरियाणा सरकारनं पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाला सांगितलं की, शेतकरी दिल्लीत जाऊन संसदेला घेराव घालू शकतात. शेतकऱ्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली तर ते दिल्लीत तळ ठोकतील. त्यामुळे लोकांची अडचण होऊ शकते. त्यामुळे पंजाबहून दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर थांबवण्यात आलं आहे. तेथे पोलीस आणि सुरक्षा दलानं शेतकऱ्यांवर अश्रुधुराचे नळकांडीही सोडली होती. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना रोखलं आहे.

हे वाचलंत का :

  1. आज शेतकऱ्यांचा 'भारत बंद', ट्रक आणि कामगार संघटनांचाही पाठिंबा; वाचा कोण-कोणत्या सेवा चालू राहतील
Last Updated : Feb 16, 2024, 2:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details