महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सामाजिक बांधिलकी जपणारं 'ईनाडू' नैसर्गिक आपत्तीत लोकांचं ठरलं तारणहार - Eenadu Golden Jubilee - EENADU GOLDEN JUBILEE

Eenadu Golden Jubilee : 10 ऑगस्ट 2024 रोजी 'ईनाडू' आपल्या गौरवशाली प्रवासाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. या तेलगू वृत्तपत्रानं केवळ बातम्याच दिल्या नाही, तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी दीन-दुबळ्यांना अनेक वेळा मदत केलीय. रामोजी राव यांच्या नेतृत्वाखाली, ईनाडूनं अनेकांना वटवृक्षाप्रमाणं आधार देत फिनिक्स पक्षाप्रमाणं उंच भरारी घेण्यासाठी प्रेरणा दिलीय. ईनाडू वृत्तपत्रातून निघाणारा प्रत्येक शब्द हा प्रकाशाच्या किरणांसारखं काम करतोय. याचं शब्दांमुळं ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरत असून 'ईनाडू'चा सुगंध आज 50 वर्षानंतरही दरवळतोय.

Eenadu
ईनाडू (Eenadu News Paper)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 6:01 AM IST

हैदराबादEenadu Golden Jubilee :वृत्तपत्र हे केवळ वृत्त पुरवठादाराच्या भूमिकेपुरतं मर्यादित नसायला हवं. कारण आपत्तीच्या वेळी वृत्तपत्रानं मदतीचा हात पुढं करायला हवा. तसंच वृत्तपत्रांनी चळवळीतील पोकळी भरून काढायला हवी. या सर्वांची पोकळी 'ईनाडू' वत्तपत्रानं भरून काढलीय. ईनाडूनं आपत्तीच्या वेळी अनेकांना मदतीचा हात पुढं केलाय. 2024 मध्ये 'ईनाडू' आपला सुवर्ण मोहत्सव साजरा करात आहे. ईनाडूनं वृत्तपत्रानं अनेक वेळा समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं असून सार्वजनिक आंदोलनांना श्वास दिलाय. त्यामुळं ईनाडू केवळ वृत्तपत्र नसून करोडो लोकांच्या मदतीचं तारणहार ठरलंय.

केवळ समकालीन बातम्यांचं प्रकाशन नाही, तर सामाजिक दायित्व हे वृत्तपत्रांचं कर्तव्य असल्याचं ईनाडूचं मत आहे. पाच दशकांहून अधिक काळ, ईनाडूनं केवळ बातम्यातूनच नव्हे, तर व्यवहारातही तीच प्रामाणिकता दाखवली आहे. 1976 साली 'ईनाडू' वृत्तपत्राचं प्रकाशन होऊन केवळ दोन वर्ष झाली होती. त्यावेळी सलग तीन वादळं तेलगू भूमीवर आदळल्यानं लोकांना अश्रू अनावर झाले होते. तसंच लाखो एकर पिकांचं नुकसान झालं होतं. हे सर्व पाहून सर्वस्व गमावलेल्या असंख्य लोकांच्या आक्रोशानं 'ईनाडू'ला धक्का बसला. काही दिवसांतच दहा हजार रुपयांचा मदतनिधी नुकसाग्रस्तांसाठी गोळा करण्यात आला. तसंच शक्य तेवढी मदत करावी वाचकांनी करावी, असं अवाहन ईनाडूनं केलं. ईनाडूच्या आवाहनामुळं तेलुगू वाचकांनी मोठं मन दाखववत एका महिन्यात सुमारे 64 हजार 756 रुपयांच्या देणग्या दिल्या. त्यानंतर ईनाडूनं ही सर्व रक्कम सरकारला दिली.

1977 मध्ये ईनाडूनं दिविसीमा पूरग्रस्तांना मदत केली. या आपत्तीत हजारो लोकांची घरे गेली होती. त्यांना अन्न, कपड्यांशिवाय रस्त्यावर सोडण्यात आलं होतं. त्यांच्या मदतीसाठी 25 हजार रुपयांचा मदतनिधी सुरू करण्यात आला. त्यानंतर ईनाडूच्या वाचकांनी एकूण 3 लाख 73 हजार 927 रुपये जमा केले. या मदतीमुळं पालकायथिप्पा या जीर्ण झालेल्या गावाचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. राज्य सरकारनं रामकृष्ण मिशनच्या सहकार्यानं 112 घरे बांधली. तसंच त्या गावाला परमहंसपुरम असं नवीन नाव देण्यात आलं.

त्या गावाच्या पुनर्बांधणीवर खर्च झाल्यानंतर उरलेल्या पैशातून कोदूरजवळील कृष्णपुरममध्ये आणखी 22 घरं बांधण्यात आली. त्या दिवशीच्या आपत्तीत उपाशीपोटी झोपलेल्या पीडितांना खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली. 50 हजार लोकांना जेवणाचे पार्सल देण्यात आले. विशाखापट्टणम येथील डॉल्फिन हॉटेल्सच्या आवारात अन्न शिजवलं गेलं. ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी ते पीडितांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळं नागरिकांनी मानव धर्माचं पालन केल्याबद्दल ईनाडूचं कौतुक केलं.

1996 मध्ये, ऑक्टोबरमध्ये तसंच नोव्हेंबरमध्ये प्रकाशम, नेल्लोर, कडप्पा तसंच गोदावरी जिल्ह्यांमध्ये वादळानं कहर केला होता. त्यावेळी ईनाडूनं (Eenadu) 25 लाख रुपयांचा मदत निधी सुरू केला. त्यानंतर 60 लाख रुपये वृत्तपत्रांकडं जमा झाले. हा निधी पूरग्रस्तांसाठी वापरायचा, असं वृत्तपत्रानं ठरवलं. सूर्या इमारती बांधण्याचा निर्णय घेतला. ज्याचा वापर वादळ दरम्यान आराम निवारा म्हणून तसंच सामान्य काळात शाळा म्हणून केला जाऊ शकतो. 'ईनाडू'च्या टीमनं अशा इमारतींसाठी गरजू गावांचा शोध घेतला. दोन महिन्यांत 60 गावांमध्ये या इमारतींचं बांधकाम पूर्ण झालं. ईनाडूच्या आवाहनाला प्रतिसाद देत देणगीदारांनीही सिमेंट, लोखंड, वाळू देऊन मदत केली.

ऑक्टोबर 2009 मध्ये, कृष्णा, तुंगभद्रा तसंच कुंडुन नद्यांसाठी सुंदर असलेल्या कर्नूल, महबूबनगर जिल्ह्यांत सुमारे 1.20 लाख फूड पॅकेटचं वाटप करण्यात आलं. देणगीदारांनी दिलेल्या देणग्यामुळं 6.05 कोटी जमा झाले. त्या पैशातून महबूबनगर जिल्ह्यातील 1 हजार 110 हातमाग कुटुंबांना यंत्रमाग देण्यात आले. कुरनूल जिल्ह्यात 'उषोदय शाळेच्या इमारती' बांधून सरकारच्या ताब्यात देण्यात आल्या. लोकांनी पुढं येऊन आणखी 3.16 कोटी रुपयांची देणगी दिली. एकूण 6.16 कोटी रुपयांच्या सहाय्यता निधीतून, विशाखापट्टणम जिल्ह्यातील तंटाडी-वडापलेम गावात 80 घरं बांधण्यात आली. श्रीकाकुलम जिल्ह्यातील जुन्या मेघावरममध्ये 36 घरं बांधण्यात आली. तसंच उम्मिलाडा येथे 28 घरं बांधण्यात आली.

2020 मध्ये अतिवृष्टीमुळं, तेलंगणात प्रचंड नुकसान झालं होतं. त्यावेळी ईनाडू ग्रुपनं मुख्यमंत्री मदत निधीला 5 कोटी रुपये दिले. 2020 मधील कोरोना आपत्ती दरम्यान, मुख्यमंत्री मदत निधीच्या माध्यमातून, प्रत्येकी 10 कोटी रुपये असे एकूण 20 कोटी रुपये स्वतंत्रपणे तेलुगू राज्यांना दान करण्यात आले. रामोजी फाऊंडेशनच्या माध्यमातून कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी तसंच रंगा रेड्डी जिल्ह्यातील नागनपल्ली गावांना दत्तक घेण्यात आलं.

रामोजी ग्रुपचे अध्यक्ष रामोजी राव यांनी 5 कोटी रुपये खर्चून वृद्धाश्रम बांधलं असून शेतकऱ्यांना निवारा दिला आहे. त्यांनी 10 लाख रुपयांची देणगी जाहीर केलीय. वाचक आणि देणगीदारांच्या पाठिंब्यामुळं 45 लाख 83 हजार 148 रुपये जमा झाले आहेत. त्या पैशातून जगतसिंगपूर जिल्ह्यातील कोनागुल्ली गावात रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून 60 घरं बांधण्यात आली. 2001 मध्ये भूकंप झालेल्या गुजरातसाठी ईनाडूनं 25 लाख रुपयांचा मदत निधी दिला होता. तसंच नागरिकांनी दिलेल्या देणगीतून 2.12 कोटी रुपये जमा झाले. स्वामी नारायण ट्रस्टच्या माध्यमातून 104 घरं बांधून बेघरांना निवारा दिण्यात आला.

2004 मध्ये त्सुनामी आपत्तीचा तडाखा बसलेल्या तामिळनाडूमध्ये ईनाडू लोकांच्या पाठीशी खंबिरपणे उभा होता. या आपत्तीसाठी ईनाडूनं 25 लाख रुपयांचा मदतनिधी दिला. देणगीदारांच्या मदतीनं हा निधी अडीच कोटीपर्यंत पोहचला. रामकृष्ण मठाच्या सहकार्यानं कुड्डालोर जिल्ह्यातील वडुक्कू मुदुसल ओडाई गावात 104 घरं बांधण्यात आली. नागापट्टिनम जिल्ह्यातील नांबियार नगरमधील 60 कुटुंबांना घरं उपलब्ध करून देण्यात आली.

2018 मध्ये केरळमधील पूरग्रस्तांच्या मदत करण्यासाठी 3 कोटी रुपयांचा मदत निधी जमा करण्यात आला. तसंच लोकांच्या मदतीनं 7 कोटी 77 लाख जमा झाले. त्या पैशातून ईनाडूनं पक्की घरे बांधली. प्रादेशिक वृत्तपत्र म्हणून जन्माला आलेल्या ईनाडूनं 'सेवा ब्रीदवाक्य' घेऊन मानवतेचा सुगंध देशभर पसरवला.

1995 मध्ये ईनाडू कोणाचीही वाट न पहाता नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार केला. त्यातून ईनाडूमुळं गावोगावी रस्ते तयार झाले. पुलांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. कालव्याचं काम हाती घेण्यात आलं. त्यामुळं तलावांना नवसंजीवनी मिळाली. आजही वृत्तपत्र कोणाचीही वाट न पहाता नागरिकांच्या मदतीला कायम तत्पर असतं. 2016 मध्ये ईनाडूने भूजलमध्ये पाणी पातळी वाढवण्यासाठी अभियान हाती घेतलं. Eenadu तसंच ETV नं सुजलाम-सुफलाम् कार्यक्रमाद्वारे जनतेला समाजसेवेत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. यातून लाखो विहिरी बांधल्या गेल्या. या जलसंवर्धनामुळं पंतप्रधान मोदींनी यांनी 'मन की बात रेडिओ' कार्यक्रमात ईनाडूचं कौतुक केलं. ईनाडूतर्फे स्वच्छ भारत कार्यक्रम लोकांपर्यंत पोहचवण्यात आला. रामोजी राव यांच्या कार्याचं कौतुक करत पंतप्रधान मोदींनी त्यांना स्वच्छ भारतचे राजदूत (Ambassador) म्हणुन नियुक्त केलं होतं.

बातमी एखादी समस्या सोडवून जीवनाला आकार देऊ शकतो, हे ईनाडू वृत्तपत्रानं दाखवून दिलं. 'ईनाडू'मुळं आज अनेकांचं अंधारमय झालेलं आयुष्य नव्या प्रकाशात बहरतंय. बेरोजगारी, शाळा, महाविद्याल, विद्यापीठाचा फीसचा प्रश्न, रुग्णांना मदत अशा अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी ईनाडूच्या उपक्रमामुळं शक्य झाल्या. या वृत्तपत्रानं हजारो कुटुंबांना नवी दिशा दाखवली. अनेक प्रेरणादायी कथांनी भावी पिढ्यांना नवा मार्ग दाखवला, त्यांच्यात नवीन कल्पनाशक्ती जागृत केली. दीन, दुबळ्यांच्या बातम्यांना प्राधान्य देण्याची रामोजीरावांची आग्रहाची सूचना आहे. ईनाडू वृत्तपत्रातून निघाणारा प्रत्येक शब्द हा प्रकाशाच्या किरणांसारखं काम करतोय. याचं शब्दांमुळं ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरतोय

'हे' वाचलंत का :

  1. 'ईनाडू'ची 50 वर्षे : 'ईनाडू' वृत्तपत्रानं सत्य आणि न्यायासाठी दिला लढा - 50 Years of Eenadu
  2. 'ईनाडू'च्या गौरवशाली प्रवासाची 50 वर्षे पूर्ण, प्रादेशिक भाषेत अग्रगण्य राहून घडविली 'माहिती क्रांती' - Eenadu Golden Jubilee

ABOUT THE AUTHOR

...view details