महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मेरठमधील प्रसिद्ध व्यावसायिकांच्या घरांवर ईडीचे छापे; 32 कोटींचे हिरे जप्त, माजी आयएएसचे नावही समोर - Meerut businessmen houses ED raids

ED Raids On Businessmen Houses : मेरठमधील प्रसिद्ध व्यावसायिकांच्या घरांवर ईडीच्या पथकानं छापे टाकले. यादरम्यान काही कोटी रुपयांच्या हिऱ्यांशिवाय, खरेदी केलेल्या मालमत्तेची कागदपत्रंही पथकाला सापडली. तर आता व्यावसायिकाचे नातेवाईकही ईडीच्या निशाण्यावर आहेत.

ED raids on meerut businessmen houses, rs 32 crore diamonds recovered former IAS also comes to light
मेरठमधील प्रसिद्ध व्यावसायिकांच्या घरांवर ईडीचे छापे (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2024, 11:37 AM IST

मेरठ ED Raids On Businessmen Houses : मेरठजिल्ह्यातील प्रसिद्ध निर्यात व्यावसायिकांच्या घरांवर ईडीनं टाकलेल्या छाप्यात तब्बल 32 कोटी रुपयांचे हिरे सापडले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून ईडीचे पथक शहरात तळ ठोकून आहे. या प्रकरणात आता माजी आयएएस अधिकाऱ्याचं नावही समोर आलंय. माजी आयएएसच्या संगनमतानं या प्रकल्पात गुंतवणुकीच्या नावाखाली 426 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं सांगण्यात येतंय. तसंच मनी लाँड्रिंगच्या माध्यमातूनही फसवणूक करण्यात आली होती. ईडीच्या या छाप्यानंतर शहरात एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय.

12 ठिकाणांवर ईडीचे छापे : ईडीच्या पथकानं दिल्ली, नोएडा, मेरठ, चंदीगड आणि गोव्यातील व्यावसायिकांच्या 12 ठिकाणांवर छापे टाकले. या काळात 42.56 कोटी रुपयांची रोकड आणि हिऱ्यांसह कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रं जप्त करण्यात आली. ईडीच्या तपासात अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात माजी आयएएस अधिकाऱ्याचं नावही समोर आलंय. एक्स्पोर्ट कंपनीच्या मालकांकडं कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. तसंच हिरे कधी खरेदी करण्यात आलेत, याबाबत ईडी व्यावसायिकांची चौकशी करू शकते.

ऑगस्ट 2024 मध्ये, मेरठ विकास प्राधिकरणाकडून प्राइम लोकेशनवर 91 कोटी रुपयांची जमीन बोली लावून खरेदी करण्यात आली. त्यावर ग्रुप हाउसिंग बांधण्याची तयारी सुरू आहे. माजी आयएएस अधिकाऱ्यानं दिल्लीतून मौल्यवान हिरे खरेदी केल्याचे तपासात समोर आलंय. ईडी पथकाच्या चौकशीत त्यानं सांगितलं की, त्याची सुमारे 30 वर्षांपासून एका ज्वेलर्सशी मैत्री आहे. त्याच्याकडं जास्तीची रोकड असल्यामुळं त्यानं हिऱ्यांमध्ये गुंतवणूक केली.

हेही वाचा -

  1. फेअरप्ले ॲप प्रकरणी ईडीचं धाडसत्र, मुंबई आणि पुण्यात एकूण १९ ठिकाणी छापेमारी - ED Raid In Mumbai
  2. ईडीनं छापे टाकून मंत्र्याच्या निकटवर्तीयांकडून जप्त केले २५ कोटी रुपये, कुठे झाली कारवाई? - ED Raid in Ranchi
  3. सपा आमदार इरफान सोलंकीच्या घरावर ईडीची छापेमारी; मुंबईत अलिशान घर असल्याचं उघड

ABOUT THE AUTHOR

...view details