महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Congress MLA Amba Prasad: भाजपानं दिलेल्या 'त्या' प्रस्तावाकडं दुर्लक्ष केल्यानं... ईडीच्या छापेमारीनंतर कॉंग्रेस आमदाराचा गंभीर आरोप - bjps offer of lok sabha ticket

ED raids on Congress MLA Amba Prasad : ईडीनं कॉंग्रेस आमदार अंबा प्रसाद यांच्या निवासस्थानी छापेमारी केलीय. त्यानंतर त्यांनी हजारीबागमधून लोकसभेचं तिकीट ऑफर करण्यात आलं होतं. पण मी भाजपच्या प्रस्तावाकडं दुर्लक्ष केले. त्यानंतर दबाव टाकण्यात आल्याचा त्यांनी दावा केलाय.

Congress MLA Amba Prasad: "मला भाजपानं लेकसभेचं तिकीट ऑफर केलं होतं", ईडीच्या छापेमारीनंतर कॉंग्रेस आमदार अंबा प्रसाद यांचा दावा
Congress MLA Amba Prasad: "मला भाजपानं लेकसभेचं तिकीट ऑफर केलं होतं", ईडीच्या छापेमारीनंतर कॉंग्रेस आमदार अंबा प्रसाद यांचा दावा

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 8:49 AM IST

रांची ED raids on Congress MLA Amba Prasad :भाजपाकडून ईडीचा वापर करून दबाव टाकला जात असल्याचा आरोप देभभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून होतो. यात आता छत्तीसगडच्या आमदाराची भर पडलीय. अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) मंगळवारी काँग्रेस आमदार अंबा प्रसाद यांच्या रांची येथील निवासस्थानी आणि राज्यातील इतर ठिकाणी छापे टाकले. ईडीच्या कारवाईनंतर अंबा प्रसाद यांनी गंभीर आरोप केले. "मला दिवसभर त्रास आणि छळ सहन करावा लागला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तासनतास एका जागी उभं केलं," असा आरोप काँग्रेस आमदारानं केलाय.

भाजपाचा उमेदवारीसाठी दबाव : भाजपावर गंभीर आरोप करत अंबा प्रसादनं म्हटलंय की, "मला हजारीबागमधून लोकसभेचं तिकीट देऊ केलं होतं. पण मी भाजपाच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं. राष्ट्रीय स्वंयसेवकांशी संघाशी संबंधित अनेकांनी माझ्यावर निवडणूक लढवण्यासाठी दबाव आणला. मीही त्याच्यांकडे दुर्लक्ष केलं. आम्ही बरकागाव मतदारसंघात सातत्यानं विजय मिळवत असल्यानं हजारीबागमधील भाजप-आरएसएसचे लोक मला एक प्रभावशाली नेता म्हणून पाहतात. आम्ही काँग्रेसचे आहोत, त्यामुळे आम्हाला टार्गेट केलं जातंय," असंही त्या म्हणाल्या.

18 तास छापेमारी : मंगळवारी सुमारे 18 तास ईडीनं काँग्रेस आमदाराच्या घरावर छापे टाकले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत अंबा प्रसाद यांच्या रांची येथील निवासस्थानाची झडती घेतली. कथित जमीन आणि बदली-पोस्टिंग घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस आमदार अंबा प्रसाद यांच्या परिसराची झडती घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. काँग्रेस आमदाराविरुद्ध 2023 मध्ये ईडीच्या रांची विभागीय कार्यालयात मनी लाँड्रिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. या तक्रारीच्या आधारे, ईडीच्या उपसंचालक स्तरावरील अधिकाऱ्यांनी झारखंड पोलिसांकडून अंबा प्रसाद यांच्या विरोधात नोंदवलेल्या सर्व एफआयआरची माहिती मागवली होती. ईडीच्या पत्रव्यवहारानंतर पोलिसांनी बरकागावचे आमदार अंबा प्रसाद यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी ईडीच्या झोन कार्यालयाकडे पाठविली होती.

हेही वाचा :

  1. "मी माझ्या आजोबांना सोडून जाणार नाही"; आमदार रोहित पवारांचा स्पष्ट निर्धार
  2. लालूप्रसाद यादवांचे निकटवर्तीय राजद नेते सुभाष यादवांना ईडीकडून अटक; काय आहे प्रकरण?

ABOUT THE AUTHOR

...view details