नवी दिल्ली- ईडीच्या कारवाया आणि सीबीआयकडून होणाऱ्या चौकशी या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. विशेषत: राजकीय नेत्यांच्या घरी टाकण्यात येणाऱ्या छाप्यांमुळे ईडीच्या अधिकाऱ्यांचा चांगलाच दबदबा वाढला आहे. अशा स्थितीत आता थेट ईडीच्या सहाय्यक संचालकाला लाचखोरी प्रकरणात अटक झाली आहे.
मुंबईतील एका सराफा व्यावसायिकाकडून 20 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणात ईडीच्या सहाय्यक संचालकाला अटक केल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. ईडीच्या अधिकाऱ्यानं मुंबईतील सराफा व्यावसायिकाच्या आवारात 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्टला झडती घेतली होती. त्यानंतर ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंह यादव यांनी सराफा व्यावसायिकाकडं 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. जर पैसे नाही दिले तर अटक करू, अशी अधिकाऱ्यानं धमकी दिली.
सापळा रचून अटक-सराफा व्यावसायिकानं तडजोड करत 20 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ईडीचे अधिकारी यादव यांना सराफा व्यावसायिकाकडून 20 लाख रुपये घेताना रंगेहाथ अटक केल्याचंही सीबीआयनं म्हटलं आहे. ईडीच्या अधिकाऱ्याकडून लाच मागितली जात असल्याची तक्रार सराफा व्यावसायिकानं सीबीआयकडं केली. त्यानंतर सीबीआयनं सापळा रचण्यात आला. ईडीच्या अधिकाऱ्याला दिल्लीतील लाजपत नगर परिसरातून अटक करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
- ईडीनं मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत संदीप सिंह यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू केली आहे. त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी पीएमएलएमधील तरतुदींनुसार त्याच्या निवासस्थानी शोध मोहीम घेतली.
काय आहे प्रकरण?- एका सराफा कंपनी विरोधात दिल्ली, उत्तराखंड आणि बंगळुरू पोलिसांमध्ये विविध एफआयआर दाखल आहेत. त्यामधील आरोपानुसार ईडीकडून कंपनी विरोधात मनी लाँड्रिग प्रकरणाचा तपास सुरू आहे. ईडीच्या कारवाईदरम्यान मुंबईतील कंपनीशी संबंधित आवाराची तीन आणि चार ऑगस्टला झाडाझडती घेण्यात आली. ईडी करत असलेल्या तपासात अटक न करण्यासाठी नवी दिल्लीतील ईडी मुख्यालयातील ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंग यांनी वीस लाखांची लाच मागितल्याची लेखी तक्रार सराफा व्यावसायिकानं दिली होती.
ईडीकडून तपास सुरू- ईडीच्या कारवाईदरम्यान ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंह यांची सर्च वॉरटचे अधिकृत अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र, हे करताना नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. एवढेच नव्हे तर संदीप सिंह हे या प्रकरणात तपास अधिकारीदेखील नव्हते. मात्र, त्यांनी तपास अधिकारी असल्याचे दर्शवित लाच घेतल्याचं ईडीनं म्हटलंआहे. या प्रकरणात तपास सुरू असल्याचं ईडीनं म्हटलं आहे.
लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल-सराफा व्यावसायिकानं दिलेल्या लेखी तक्रारीवरून प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अॅक्ट कलम 7 आणि भारतीय न्याय संहिता कलम 61(2)(अ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नवी दिल्लीतील जिंदगी मुख्यालयातील इन्वेस्टीगेशन युनिट 1 चे सहाय्यक संचालक संदीप सिंग आणि इतर अज्ञात व्यक्ती विरोधात दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास डीएसपी अरुण भास्कर हे करत आहेत.
- यापूर्वीदेखील ईडीच्या अधिकाऱ्यांना अटक-विशेष म्हणजे यापूर्वीदेखील ईडीच्या सहाय्यक संचालकासह इतर सहा अधिकाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात ऑगस्ट 2023 मध्ये रंगेहाथ अटक झाली होती. त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली दारू घोटाळ्यात व्यापारी अमन धल्ल यांच्याकडून 5 कोटी रुपयांची लाच मागितली होती.
हेही वाचा-
- "सरकार गुंडांच्या टोळ्या चालवतंय, त्याचे प्रमुख दिल्लीत बसलेत"; संजय राऊतांचा प्रहार - Sanjay Raut
- दिल्ली दारू घोटाळा : आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा होणार फैसला, सीबीआय कारवाईवर मिळणार दिलासा ? - Arvind Kejriwal CBI Arrest Case