देहरादून :उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. उत्तराखंडमधील सीमावर्ती जिल्ह्यात शनिवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसल्यानं मोठा हादरा बसला. पहाटे 4 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचं नागरिकांनी स्पष्ट केलं. भूकंपाचे धक्के जाणवल्यानं कडाक्याच्या थंडीत नागरिक घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी गेले. मात्र आतापर्यंत भूकंपामुळे कुठलंही नुकसान झाल्याचं वृत्त नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पिथौरागढमध्ये भूकंपाचे धक्के :उत्तराखंडमधील सीमावर्ती परिसरात असलेल्या पिथौरागढमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवल्यानं त्यांनी कडाक्याच्या थंडीत घराबाहेर धून ठोकली. या भूकंपाचं केंद्र नेपाळ असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलं. या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपानं कुठंही नुकसान झालेलं नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. चंपावतसह इतर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. आतापर्यंत या भूकंपामुळे कुठलंही नुकसान झाल्याचं वृत्त नाही. नेपाळमधील जुमला जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या 10 किमी खोलीवर होता. मात्र, भूकंपाचे धक्के जाणवत असताना बहुतांश नागरिक झोपले होते.