नवी दिल्ली Swati Maliwal Assault Case : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलं आहे. बिभव कुमार यांनी शुक्रवारी उत्तर दिल्ली जिल्ह्यातील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात स्वाती मालीवाल यांच्या विरोधात ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात जबरदस्तीनं घुसणं त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणं असे अनेक आरोप स्वाती मालीवाल यांच्यावर ईमेलमध्ये करण्यात आले. दुसरीकडं स्वाती मालीवाल यांनी केलेल्या मारहाण आणि गैरवर्तनाच्या आरोपावरुन दिल्ली पोलिसांनी बिभव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला. दिल्ली पोलिसांनी बिभव कुमारला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पीएस बिभव कुमार (ETV Bharat) स्वाती मालीवाल यांचे सीसीटीव्ही फुटेजशी छेडछाडीचे आरोप :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी त्यांचे पीएस बिभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. या प्रकरणी बिभव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बिभव कुमार यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलीस आज सकाळी दाखल झाल्यानंतर बिभव कुमार यांना अटक करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बिभव कुमारांची स्वाती मालीवाल विरोधात तक्रार :बिभव कुमार यांनी दिल्ली पोलिसांना ईमेल पाठवून स्वाती मालीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून बाहेर जाण्यास सांगितलं असता त्यांनी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केल्याचा आरोप बिभव कुमार यांनी केला. खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी स्वाती मालीवाल यांनी दिली, असंही या तक्रारीत नमूद करण्यात आलं. स्वाती मालीवाल यांच्यावर जबरदस्तीनं मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसणे आणि मुख्यमंत्र्यांची सुरक्षा धोक्यात घालणे असे अनेक गंभीर आरोप करण्यात आले. स्वाती मालीवाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही बिभव कुमार यांनी दिल्ली पोलिसांकडं केली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. पोलीस उपायुक्तांशी याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो होऊ शकला नाही.
हेही वाचा :
- स्वाती मालिवाल मारहाण प्रकरण : दिल्ली पोलिसांनी स्वाती मालीवाल यांचा घेतला जबाब - Swati Maliwal assault case
- Swati Maliwal Interview : दिल्लीच्या 'रेप कॅपिटल' बिरुदावलीस केंद्रसरकार जबाबदार - स्वाती मालीवाल यांची ईटीव्ही भारतला खास मुलाखत
- DCW Chief On Rape Victim : दिल्लीचे पोलीस आहेत की गुंडांचे सहकारी? स्वाती मालीवाल कडाडल्या, बलात्कार पीडितेला भेटण्यापासून रोखलं