नवी दिल्ली Delhi Liquor Scam : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयनं अटक केली आहे. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयच्या अटकेच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यांच्या या आव्हान याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मोहरमच्या सुट्टीमुळे न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं 2 जुलैला अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सीबीआयला नोटीस बजावली. अरविंद केजरीवाल यांना ईडी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.
दिल्ली उच्च न्यायालय (ETV Bharat) सीबीआयनं केलेली अटक बेकायदेशीर नाही :दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 26 जून रोजी तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. अरविंद केजरीवाल यांची सीबीआयनं केलेली अटक बेकायदेशीर नाही, असं राऊस एव्हेन्यू न्यायालयाचं न्यायाधीश अमिताभ रावत यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर 29 जूनला सीबीआयनं अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सीबीआयकडं पुरावे असल्याचा दावा :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयनं अटक केल्यानं केजरीवाल यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर सीबीआयचे वकील डीपी सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांच्याबाबत सीबीआयकडं ठोस पुरावे आहेत, असा दावा न्यायालयात केला. अनेक साक्षीदारांचे जबाब आहेत. अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणी एका व्यक्तीनं विचारलं होतं. दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळा हे धोरण तयार होण्यापूर्वीच घडल्याचं आढळून आलं आहे, असा दावा त्यांनी केला. डीपी सिंह यांनी न्यायालयात मागुंता रेड्डी यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. डीपी सिंह म्हणाले की, "सीबीआयकडं अरविंद केजरीवाल यांच्याबाबत ठोस पुरावे आहेत. साउथ ग्रुप दिल्लीला आला, त्यावेळी कोरोना शिगेला पोहोचला होता. या काळात अहवाल तयार करुन अभिषेक बोईनपल्ली यांना दिला. विजय नायर यांच्यामार्फत हा अहवाल मनीष सिसोदिया यांना देण्यात आला."
हेही वाचा :
- अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा ; सर्वोच्च न्यायालयानं दिला अंतरिम जामीन - SC Granted Bail To Arvind Kejriwal
- दिल्ली दारू घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक - Arvind Kejriwal Arrest By CBI
- केजरीवाल राहणार तुरुंगातच, दिल्ली उच्च न्यायालयाचा जामीन देण्यास नकार - Arvind Kejriwal Bail Plea