महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

न्यायालयातील चेंबरमध्येच वकिलाचा तरुणीवर बलात्कार ; नोकरीच्या आमिषानं पीडितेला बोलावलं अन् लुटलं सर्वस्व, हाती टेकवले 1500 रुपये - Girl Alleges Rape In Court Chamber - GIRL ALLEGES RAPE IN COURT CHAMBER

Girl Alleges Rape In Court Chamber : नोकरी देण्याच्या बहाण्यानं नराधम वकिलानं तरुणीला तीस हजारी न्यायालयातील चेंबरमध्ये बोलावून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेनं केला. या प्रकरणी सब्जी मंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Girl Alleges Rape In Court Chamber
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 10:40 AM IST

नवी दिल्ली Girl Alleges Rape In Court Chamber : वकिलानं तरुणीला नोकरीच्या बहाण्यानं न्यायालयातील चेंबरमध्ये बोलावून बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे तरुणीचं सर्वस्व लुटल्यानंतर नराधम वकिलानं पीडितेच्या हातावर 1500 रुपये टेकवले अन् धमकी देत काढून दिलं, असा आरोप पीडितेनं केला. वकिलानं चेंबरमध्ये बोलावून बलात्कार केल्यानं पीडितेला मोठा हादरा बसला. त्यामुळे हादरलेल्या पीडित तरुणीनं घरी गेल्यानंतर घडलेली आपबिती आपल्या मावशीकडं कथन केली. या घटनेनं पीडितेच्या मावशीलाही मोठा धक्का बसल्यानं त्यांनी त्यांनी पीडितेला घेऊन पोलीस ठाणं गाठलं.

वकिलानं न्यायालयातील चेंबरमध्ये केला बलात्कार :वकिलानं दिल्लीतील एका तरुणीला नोकरी देण्याच्या बहाण्यानं न्यायालयातील चेंबरमध्ये बोलावलं होतं. मात्र तीस हजारी न्यायालयातील चेंबरमध्ये या वकिलानं तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेनं केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर दिल्लीतील उत्तर दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात एका वकिलानं आपल्या चेंबरमध्ये पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप 21 वर्षीय तरुणीनं केला आहे. पीडितेनं तक्रारीत नमूद केलं आहे की, आरोपी वकिलानं तिला नोकरी देण्याच्या बहाण्यानं 27 जुलैला बोलावलं. यावेळी विकालानं तिच्यावर जबरदस्ती केली.

बलात्कारानंतर पीडितेच्या हातावर टेकवले 1500 रुपये :वकिलानं पीडितेवर न्यायालयाच्या चेंबरमध्ये बलात्कार केल्यानंतर पीडितेला मोठा हादरा बसला. यावेळी नराधम वकिलानं पीडितेच्या हातावर 1500 रुपये टेकवले. याबाबत कोणाला माहिती दिल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी नराधमानं पीडितेला दिली. पीडितेनं घरी पोहोचल्यानंतर मावशीला संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यामुळे पीडितेच्या मावशीनं पीडितेला घेऊन पोलीस ठाणं गाठलं. वकिलानं न्यायालयातील चेंबरमध्ये बलात्कार केल्यानं पीडितेला जबर हादरा बसला आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन नराधम वकिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सब्जी मंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. स्त्रीच होते स्त्रीची शत्रू!अल्पवयीन मुलीवर बलात्कारासाठी तरुणीनं केली वृद्ध प्रियकराला मदत, व्हिडिओ बनवून पीडितेचं ब्लॅकमेलिंग - Minor Girl Rape Case Thane
  2. नववीत शिकणाऱ्या मुलीला लॉजवर नेऊन अत्याचार, पीडितेच्या कुटुंबीयांना आरोपीकडून धमक्या - Minor Girl Rape Case Beed
  3. बलात्कार पीडितेची आत्महत्या: गावातीलच नराधमानं अत्याचार केल्याच्या धक्क्यातून पीडितेनं घेतलं जाळून - Rape Victim Dies By Suicide

ABOUT THE AUTHOR

...view details