नवी दिल्ली Arvind Kejriwal To Resign : दिल्ली दारु घोटाळ्यात अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिल्यामुळे ते शनिवारी कारागृहाबाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी आज मोठं वक्तव्य केलं आहे. आपण दोन दिवसात राजीनामा देणार असून निवडणुकीपर्यंत कोणी दुसरा नेता मुख्यमंत्री होईल. मात्र निवडणूक आयोगानं महाराष्ट्राबरोबर दिल्लीच्याही निवडणूक घ्यावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.
दोन दिवसात राजीनामा देणार, महाराष्ट्रासह दिल्लीच्या निवडणुका घ्या; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा - Arvind Kejriwal To Resign - ARVIND KEJRIWAL TO RESIGN
Arvind Kejriwal To Resign : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. आपण दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर केला, मात्र कोणत्याही पाईलवर सही करण्यास अरविंद केजरीवाल यांना मनाई केली आहे.
Published : Sep 15, 2024, 12:49 PM IST
दोन दिवसात देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिल्यानं कारागृहातून सुटका झाली आहे. यानंतर दिल्लीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. मात्र दिल्लीची विधानसभा भंग करण्यात येणार नाही. निवडणूक होईपर्यंत आम आदमी पक्षाच्या इतर नेत्याकडं मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.