अहमदाबाद : दिल्ली आणि गुजरात पोलिसांनी टाकलेल्या संयुक्त छाप्यात तब्बल 518 किलो कोकेन जप्त केल्यानं मोठी खळबळ उडाली. गुजरातमधील अंकलेश्वर इथल्या एका फार्मा कंपनीत टाकलेल्या छाप्यात हे कोकेन जप्त करण्यात आलं. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 5000 कोटी रुपये किंमत आहे. दिल्ली ड्रग्ज छापेमारी प्रकरणात आतापर्यंत थायलंडमधून 1,289 किलो कोकेन आणि 40 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.
'उडता गुजरात' ; अंकलेश्वरमधून तब्बल 5 हजार कोटीचं कोकेन जप्त
दिल्ली पोलीस आणि गुजरात पोलिसांनी संयुक्त छापेमारी केली. या छाप्यात पोलिसांनी तब्बल 518 किलो कोकेन जप्त केलं. याची किंमत तब्बल 5 हजार कोटी रुपये आहे.
Published : Oct 14, 2024, 10:04 AM IST
|Updated : Oct 14, 2024, 10:17 AM IST
गुजरातमधून 5 हजार कोटी रुपयाचं कोकेन जप्त :दिल्ली पोलीस आणि गुजरात पोलिसांनी संयुक्त छापेमारी करुन गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा जप्त केला. दिल्ली पोलीस आणि गुजरात पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अंकलेश्वरमधील एका फार्मा कंपनीत छापेमारी केली. यावेळी पोलिसांनी कंपनीच्या घेतलेल्या झडतीदरम्यान 518 किलो कोकेन जप्त केलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कोकेनची किंमत तब्बल 5,000 कोटी रुपये आहे. आतापर्यंत थायलंडमधून 1,289 किलो कोकेन आणि 40 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. या जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 13,000 कोटी रुपये आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.
हेही वाचा :
- नियतीने दिलं आणि ड्रग्जने नेलं, तस्करीमुळे दिग्गज खेळाडूंचं करियर 'क्लीन बोल्ड' - Sports Persons in Drugs Smuggling
- अंगझडती घेतना संशयिताच्या खिशात ड्रग्ज टाकणं भोवलं; पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस शिपायांवर निलंबनाची कुऱ्हाड - Mumbai Cops Planting Drugs
- गुजरात ATS ची मोठी कारवाई; भिवंडीतून 800 कोटीचं ड्रग्ज जप्त, दोघांना अटक - ATS Gujarat On Drugs Case