ETV Bharat / bharat

मुंबईवरुन न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्लीत इमर्जन्सी लँडींग - BOMB THREAT IN AIR INDIA FLIGHT

मुंबईवरुन न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. मुंबईतून उड्डाण केल्यानंतर या विमानाचं दिल्लीत इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं.

Bomb Threat In Air India Flight
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2024, 11:19 AM IST

नवी दिल्ली : मुंबईवरुन न्यूयॉर्कला निघालेल्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या विमानाला दिल्लीकडं वळवून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. एअर इंडियाचं हे विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जात असताना विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर ते नवी दिल्लीच्या दिशेनं वळवण्यात आलं.

मुंबईवरुन न्यूयॉर्कला निघालं होतं विमान : दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचं हे विमान मुंबईहून न्यूयॉर्कला निघालं होतं. यावेळी विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आली. त्यामुळे न्यूयॉर्कला जाणारं हे विमान दिल्लीकडं वळवण्यात आलं. हे विमान सध्या वळवून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभं आहे. विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन केलं जात आहे.

लंडनहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब : लंडनहून दिल्लीला येणाऱ्या बुधवार ९ ऑक्टोबरच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाल्यानं दिल्लीतील आयजीआय विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली. बुधवारी सकाळी 8.45 च्या सुमारास IGI विमानतळ प्राधिकरणाला एक कॉल आला, यामध्ये लंडनहून दिल्लीला येणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली. फोन करणाऱ्यानं फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये एक चिठ्ठी सापडली, यामध्ये 'या विमानावर बॉम्बफेक' असं लिहिलेलं होतं. मात्र, मिळालेल्या माहितीनंतर विमान तीन तास उडत राहिलं, त्यानंतर रात्री 11.45 वाजता दिल्लीत उतरलं गेलं. 1 सप्टेंबर 2024 रोजी जबलपूरहून हैदराबादला जाणारं इंडिगो फ्लाइट 6E 7308 बॉम्बच्या धमकीमुळे नागपूरला वळवण्यात आलं होतं. लँडिंग करुन सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. यावेळी तपासणी करण्यात आली. यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी मुंबईहून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर तिरुवनंतपुरम विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. एअर इंडियाच्या विमानाच्या हवेतच दोन तास घिरट्या; मुरलीधर मोहोळ म्हणाले, "मोठा अपघात..."
  2. "एअर इंडियानं अन्याय केला...", रामदास आठवले नागरी उड्डाण मंत्र्यांकडं करणार तक्रार, नेमकं प्रकरण काय?
  3. विमानात प्रवास करताना तुटलेली सीट मिळाल्यानं भडकला दिग्गज क्रिकेटपटू; एअरलाइननं मागितली माफी - Jonty Rhodes LSG

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.