हैदराबाद New Bajaj Pulsar N125 Motorcycle : बजाज ऑटोची एक नवीन बाईक बाजारात दाखल होणार आहे. आघाडीची दुचाकी कंपनी बजाज ऑटो नवीन पल्सर लाँच करण्याचा विचार करत आहे. बजाज N125 चं नवीन मॉडेल असण्याची शक्यता आहे. पल्सरची आगामी बाईक 16 ऑक्टोबर 2024 रोजी लॉन्च केली जाऊ शकते. पल्सर N रेंजची ही सर्वात स्वस्त पल्सर बाईक असू शकते, असं मानलं जातय.
बजाज ऑटोची पल्सर दुचाकी प्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहे.आता कंपनी लवकरच नवीन Bajaj Pulsar N125 बाजारात आणणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, नवीन Bajaj Pulsar N125 या आठवड्यात 16 ऑक्टोबर रोजी लॉन्च होऊ शकते.
कशी असणार दुचाकी : ही मोटारसायकल कंपनीसाठी महत्त्वाची असणार आहे, कारण ही मोटरसायकल TVS Raider आणि Hero Xtreme सारख्या लोकप्रिय नवीन जनरेशन 125 मोटारसायकलींशी स्पर्धा करेल. अशा परिस्थितीत, या नवीन बाईकची रचना मोठ्या पल्सर N150, N160 आणि N250 सारखी असू शकते, अशी अपेक्षा आहे.
डिझाइन : आत्तापर्यंत सर्व N सीरिज बाइक्समध्ये नवीन इंजिन आहे, जे उच्च पातळीच्या स्मूथनेस येतं. एन सीरिजच्या पल्सरमध्ये नवीन चेसिसचा वापर करण्यात आला असून, यातही तेच पाहायला मिळेल, असा विश्वास आहे. नवीन बजाज पल्सर N125 मध्ये N150 प्लॅटफॉर्मशी काही समानता असू शकतात.
किंमत : बजाजची 125cc पल्सर ही कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वाहनांपैकी एक आहे. परंतु हिरो आणि टीव्हीएस मोटरसारख्या नवीन युगातील प्रतिस्पर्धी स्पोर्टी डिझाइन, वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत कंपनीला मागं टाकत आहेत. इथेच बजाज नवीन पल्सर N125 बाजारात आणत आहे. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास या दुचाकीची किंमत 90 हजार ते 1.1 लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये असू शकते.
हे वाचलंत का :