स्मशानभूमीची भींत ठरली यमदूत; भींत कोसळल्यानं चार जणांचा मृत्यू गुरुग्राम Cremation Wall Collapse :स्मशानभूमीची भींत कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना गुरुग्राममधील मदनपुरी परिसरात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. मदनपुरी स्मशानभूमीच्या 15 फूट उंच भींतीच्या शेजारी टेकून नागरिक बसले होते. यावेळी अचानक भींत कोसळून नागरिक या भींतीखाली दबल्या गेले. यात एका चिमुकल्यासह चार नागरिकांचा मृत्यू झाला. तर या घटनेत काही नागरिक दबल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मदनपुरी स्मशानभूमीची भींत कोसळली :गुरुग्राममध्ये मदनपुरी स्मशानभूमीच्या भींतीलगत काही नागरिक खुर्ची टाकून बसले होते. यावेळी सायंकाळची वेळ असल्यानं हे नागरिक निवांत बसले होते. मात्र अचानक भींत कोसळल्यानं या नागरिकांना उठताच आलं नाही. भींतीच्या मलब्याखाली दबल्या गेले. मदनपुरी स्मशानभूमीची इमारत पडून मलब्याखाली नागरिक दबल्याची माहिती तत्काळ प्रशासनाला देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिसांचं पथक दाखल झालं. त्यांनी बचावकार्य सुरू केलं. त्यानंतर जेसीबीच्या मदतीनं मलब्याखाली दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता, त्यातील एक चिमुकला आणि तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी गोषित केलं. त्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मदनपुरी स्मशानभूमीच्या भींतीवर लाकडांचं ओझं :गुरुग्राममधील मदनपुरी स्मशानभूमीच्या भींतीखाली दबून चार जणांचा मृत्यू झाल्यानं स्थानिक नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला. या स्मशानभूमीच्या भींतीवर हजारो टन लाकडांचा भार ठेवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. लाकडांचा भार असल्यानं भींत खाली वाकली होती. या भीतींची दुरुस्ती करण्यासाठी वारंवार स्मशानभूमीच्या व्यवस्थापकाकडं विनंती करण्यात आली, मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला. चार नागरिकांचा भींतीच्या मलब्याखाली दबून मृत्यू झाल्यानं या परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद :गुरुग्राममधील मदनपुरी स्मशानभूमीच्या भींतीखाली दबून चार नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सगळी घटना दिसून येत आहे. काही नागरिक भींतीच्या बाजुला बसले आङेत. त्यांच्यात काहीतरी चर्चा सुरू आहे, मात्र अचानक भींतीच्या कोसळण्याची घटना दिसून येत असल्यानं हे नागरिक उठून पळण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र उठण्यापूर्वीच त्यांच्यावर भींत कोसळत असल्याचं या सीसीटीव्हीतील कैद झालेल्या व्हिडिओत दिसून येत आहे.
हेही वाचा :
- Old Building Collapse : पुण्यात जुन्या वाड्याची भिंत कोसळली; तीन घरातील 11 नागरिकांना अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले बाहेर
- नाशिक : रविवार पेठेतील वैश्य वाडा कोसळला, दोन महिला गंभीर जखमी
- मध्यप्रदेशात भिंत कोसळून ५ मजूरांचा मृत्यू, १५ जखमी