नवी दिल्ली Congress Releases First List : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. काँग्रेसची पहिली यादी कधी जाहीर होईल याची सर्वत्र उत्सुकता होती. अखेर ती यादी शुक्रवारी (8 मार्च) जाहीर झालीय. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी नावं जाहीर केले. यामध्ये 39 उमेदवारांची नावं देण्यात आली आहेत.
तीन जागा होल्डवर ठेवण्यात आल्या : या पत्रकार परिषदेत जाहीर केलेल्या नावांनुसार तेलंगणा, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या राज्यांमधील एकूण 39 लोकसभा मतदारसंघांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. इतर तीन जागा होल्डवर ठेवण्यात आल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलंय. आता पुढच्या यादीत कोणाला संधी मिळणार याकडं इच्छुक उमेदवारांचं लक्ष लागलंय.
राहुल गांधी हे पुन्हा एकदा वायनाडमधून लढणार : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे पुन्हा एकदा वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. ही जागा त्यांनी 2019 मध्ये सात लाख मतांच्या लिडनं जिंकली होती. एकूण 39 उमेदवारांपैकी 15 केरळमधील, कर्नाटक आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी सहा, तर तेलंगाणातील चार उमेदवार आहेत. मेघालयातील दोन तर नागालँड आणि सिक्कीममधील प्रत्येकी एक उमेदवारांची नावं या यादीमध्ये आहेत.
काँग्रेसच्या पहिल्या यादीलीत उमेदवारांच्या नावांची यादी
तेलंगणामधील उमेदवारांची नावे
- जहिराबाद- सुरेशकुमार शेटकर
- चेवेल्ला- सुनिता महेंद्र
- नलगोंडा- रघुवीर कुंडुरु
- महबूबाबाद (ST)- बलराम नाईक पोरीका
केरळमधील उमेदवारांची नावे
- कासारगोड- राजमोहन उन्नती
- कन्नूर- के. सुधाकरन
- वडकरा- शफी पारंबील
- वायनाड- राहुल गांधी
- कोळीकोडे- एम.के. राघवन
- पलक्कड- व्ही.के. श्रीकंदन
- अलाठूर (SC)- कु. रेम्या हरिदास
- त्रिशूर- के. मुरलीधरन
- चालकुडी- बेनी बहनन
- एर्नाकुलम- हिबी ईडन
- DUKKI- डीन कुरियाकोस
- मावेलिकारा (SC)- कोडीकुन्नील सुरेश
- पठाणमथिट्टा- अँटो अँटोनी
- अट्टिंगल- अदूर प्रकाश
- तिरुवनंतपुरम- डॉ शशी थरूर