महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदींच्या विरोधात जनादेश, INDIA आघाडीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर निशाना - INDIA Alliance Meeting - INDIA ALLIANCE MEETING

INDIA Alliance Meeting : लोकसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना वेग आला आहे. एकीकडं दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी एनडीएच्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली, तर दुसरीकडं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी आघाडी 'इंडिया'ची बैठक झाली.

INDIA Alliance Meeting
INDIA आघाडीच्या बैठक (ETV BHARAT National Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 9:15 PM IST

Updated : Jun 5, 2024, 9:27 PM IST

नवी दिल्लीINDIA Alliance Meeting : लोकसभा निवडणुकीचे 2024 चे निकाल समोर आल्यानंतर बुधवारी 'इंडिया' आघाडीच्या पक्षांची पहिली बैठक झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत सरकार स्थापनेच्या शक्यता आणि पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या वेळी खरगे म्हणाले की, राज्यघटनेच्या प्रास्ताविकेवर अतूट विश्वास असलेल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय न्यायाच्या उद्दिष्टांसाठी कटिबद्ध असलेल्या सर्व पक्षांचं 'इंडिया' आघाडीत स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीचा जनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे, पण ते नाकारण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, असंही काँग्रेस अध्यक्ष म्हणाले.

'मी 'इंडिया' आघाडीतील सर्व मित्रांचं स्वागत करतो. आम्ही एकत्र लढलो, समन्वयानं पूर्ण ताकदीने लढलो. तुम्हा सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. 18 वी लोकसभा निवडणूक थेट मोदींच्या नावावर लढली गेली. मात्र, जनतेनं भाजपाला बहुमत न देता त्यांच्या नेतृत्वाविरोधात जनादेश दिला आहे'. - मल्लिकार्जुन खरगे

मित्रपक्षांशिवाय मोदी सरकार चालवू शकणार नाहीत :आरजेडी नेते तेजस्वी यादव यावेळी म्हणाले की, 'एनडीएकडं संख्यात्मक बळ आहे. पण, आम्हाला असं सरकार बनवायचं आहे, जे बिहारची काळजी घेईल. तसंच बिहारला विशेष राज्याचा दर्जा देईल. नितीश कुमार यांच्यासाठी ही चांगली संधी आहे, ते किंगमेकर असतील. त्यांनी बिहारला विशेष दर्जा देऊन संपूर्ण देशात जातीय जनगणना करावी. पंतप्रधान मोदींची जादू संपली आहे. ते बहुमतापासून दूर असल्याचं आपण पहिल्यांदाच पाहात आहोत. त्यांना त्यांच्या दोन सहकाऱ्यांशिवाय सरकार चालवता येणार नाही'.

बैठकीला 'हे' नेते उपस्थित : या बैठकीला खरगे यांच्याशिवाय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एसपी) अध्यक्ष शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, राघव चढ्ढा, शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

हे वाचलंत का :

  1. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड, 16 पक्षांचे 21 नेते बैठकीला हजर; राष्ट्रपतींनी लोकसभा केली विसर्जित - NDA Leaders Meeting
  2. शरद पवारांची चाणाक्य नीती त्याला उद्धव ठाकरेंची साथ, पडली महायुतीवर भारी; 45 पार म्हणणारे सपशेल फेल - Lok Sabha Result 2024
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2024: 'या' सात मतदारसंघातील प्रस्थापितांना धक्का, का पडले दिग्गज? घ्या जाणून - Lok Sabha Election Results 2024
Last Updated : Jun 5, 2024, 9:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details