महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक; जागा वाटपांवरुन राहुल गांधी नाराज ?, नाना पटोले आक्रमक

विधानसभा निवडणूक 2024 च्या जागा वाटपासाठी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची राहुल गांधींसोबत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसनं जास्त जागांचा आग्रह धरल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Congress Meeting Held In Delhi
विरोधी पक्षनेते राहुल गांधी (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2024, 10:48 AM IST

नवी दिल्ली :विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या जोरदारपणे सुरू आहे. मात्र जागा वाटपांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत मोठा वाद सुरू आहे. त्यातच महाविकास आघाडीतील नेते नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांच्यात जागा वाटपांवरुन वाद झाल्याची चर्चा आहे. शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबिसी जागांवरुन नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर नाना पटोले यांनीही आक्रमक होत आम्ही ओबीसी कोट्यासाठी अधिक जागांची मागणी केली. आमची ही मागणी पूर्ण होईल, अशी माहिती वृत्तसंस्थेला बोलताना दिली.

जागा वाटपांबाबत काय म्हणाले नाना पटोले :विधानसभा निवडणूक 2024 च्या जागा वाटपांसाठी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीत पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांना माहिती दिली. राहुल गांधी यांची सर्वसमावेश विकासाला प्राध्यान्य देण्याची भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मिळालेल्या जागांमध्ये ओबीसी घटकाला जागा देण्यासाठी आम्ही काही जागांची मागणी केली. आहे. राहुल गांधी यांचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे आता आम्ही बाळासाहेब थोरात यांना बैठकीला पाठवू, त्यानंतर याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. काँग्रेसनं 48 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर; खासदाराची बहीण रिंगणात, वाचा संपूर्ण यादी
  2. जागवाटपाचा वाद सुटल्यानं महाविकास आघाडीची 'मशाल हातात', आज होणार महत्त्वाची घोषणा
  3. काँग्रेसला मोठा धक्का : पहिल्या महापौर कमल व्यवहारेंचा राजीनामा, कोणत्या पक्षात करणार प्रवेश ?

ABOUT THE AUTHOR

...view details