महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अबुझमदमध्ये 8 नक्षलवादी ठार, 161 दिवसांत 141 माओवाद्यांचा खात्मा - Chhattisgarh Naxal Encounter Update

Chhattisgarh Naxal Encounter Update : छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु आहे. नारायणपूरच्या अबुझमद भागात सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत 8 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. या चकमकीत एक जवान हुतात्मा, तर दोन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. नारायणपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून नक्षलवादी, सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 4:20 PM IST

बस्तर Chhattisgarh Naxal Encounter Update: नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमद भागात गेल्या दोन दिवसांपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी 8 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून एक जवान हुतात्मा झालाय. तसंच या घटनेत दोन जवान जखमी झाले आहेत.

नारायणपूरमध्ये दोन दिवसांपासून चकमक सुरू : अबुझमदमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चकमक सुरू आहे. 14 जून रोजी सकाळी चकमक सुरू झाली होती. नक्षलवादी मधूनमधून गोळीबार करत आहेत. ज्याला बस्तर, नारायणपूर, कोंडागाव, दंतेवाडा या चार जिल्ह्यांतील सुरक्षा दलाचे जवान प्रत्युत्तर देत आहेत. या चकमकीत अनेक प्रमुख नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलीस करत आहेत.

संयुक्त नक्षलविरोधी अभियान सुरू : बस्तरचे आयजी सुंदरराज पी. यांनी सांगितलं की, नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमदमधील कुतुल, फरसाबेडा आणि कोडामेटा भागात संयुक्त नक्षलविरोधी अभियान आयोजित करण्यात आलं. या संयुक्त मोहिमेत DRG, STF आणि ITBP 53 व्या कॉर्प्सच्या नारायणपूर, कोंडागाव, दंतेवाडा आणि कांकेरच्या दलांचा समावेश होता. 14 जूनपासून परिसरात चकमक सुरू आहे. सुरक्षा दल अंतर्गत भागात आणि चकमकीच्या ठिकाणी शोध घेत आहेत.

हुतात्मा जवानाबद्दल शोक :छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी नारायणपूर चकमकीत हुतात्मा जवानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'ओर्छा पोलीस स्टेशन अंतर्गत फरसाबेरा-धुरबेडा दरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 8 नक्षलवादी ठार झाल्याची बातमी आहे. चकमकीत एक STF जवान हुतात्मा झाला असून 2 जवान जखमी झाल्याची दुःखद बातमीही येत आहे. जखमी सैनिकांना तात्काळ राजधानी रायपूरला नेण्यात येत आहे'.

'हे' वाचलंत का :

  1. भाविकांवर काळाचा घाला : भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळून 10 भाविक ठार, 7 गंभीर - Road Accident On Badrinath Highway
  2. कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग, 49 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये बहुतांश भारतीय असण्याची भीती - Kuwait Building Fire
  3. मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा यांच्यासह 9 जणाचा विमान अपघातात मृत्यू - Saulos Chilima dies in plane crash

ABOUT THE AUTHOR

...view details