रांचीBijapur Naxal Encounter - बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोरचोली आणि लेंड्रा जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. या कारवाईत ८ नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांकडून आणखी शोध मोहिम सुरू आहे.
पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी डीआरजी, सीआरपीएफचे कोबरा बटालियन, बस्तर फायटर्स, एसटीएफ आणि सीएएफच्या जवानांच्या संयुक्त टीम ही नक्षलविरोधी अभियान करण्यास सुरुवात केली. सुरक्षादलाचे जवान हे आज सकाळी ६ वाजता कोरचोली आणि लेंड्रा जंगलात पोहोचले. तेव्हा नक्षलवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार केला. जवानांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिला. त्यात ८ नक्षलवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलानं नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतेले आहेत. त्यांच्याजवळ एलएमजी, एके ४७ सारखे स्वयंचलित बंदुका आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा सापडला आहे. सुरक्षा दलानं केलेल्या गोळीबारात काही नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता आहे. तर सर्व जवान सुरक्षित आहेत.
- बिजापूरचे एएसपी म्हणाले, "ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटली नाही. नक्षलवाद्यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर किती बक्षीस होते, ही माहिती समोर येणार आहे.