लखनौ: सेंट्रल कौन्सिलन ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) आज इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर केले आहेत. तिरुअनंतपुरममधील विद्यार्थ्यांनी बारावीच्या निकालात सर्वोत्तम कामगिरी केली होती. तिरुवनंतपुरमध्ये बारावीत 99.81 टक्के मुले बारावी उत्तीर्ण झाली आहेत. तर सर्वात सुमार कामगिरी प्रयागराजमध्ये झाले. त्यापैकी केवळ 78.25 टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण परिषद CBSE बोर्डानं सोमवारी 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून ते 2 एप्रिलपर्यंत सुरू होती. दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत झाली. बारावीची परीक्षा 47 दिवसांत तर दहावीची 28 दिवसांत संपली होती. सीबीएसई बोर्डाकडून दहावी आणि बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांमधील स्पर्धा टाळण्यासाठी गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही.
सीबीएसई इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी पुन्हा एकदा मुलांना मागे टाकलं आहे. बारावीच्या परीक्षेत एकूण 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी उत्तीर्ण होण्याचे एकूण प्रमाण 87.33 टक्के होते. यंदा 91.52 टक्के मुली परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या तुलनेत हे 6.40 टक्के प्रमाण जास्त आहेत. एकूण 24,068 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तर 1,16,145 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं.
दहावीचा 93.60 टक्के निकाल-सीबीएसईनं सोमवारी इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत एकूण 93.60 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी मुलांपेक्षा 2.04 टक्के गुण मिळवले आहेत. 94.75 टक्के मुली परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. 47,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांहून अधिक मिळविले आहेत. तर 2.12 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.
हेही वाचा-
- सीबीएसई बोर्डानं 10वी आणि 12वीच्या निकालासंदर्भात दिली माहिती - cbse board gave information