लखनऊ :अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या धमकी प्रकरणात बिहार पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी उडी घेतली. मात्र त्यानंतर पप्पू यादव यांना लॉरेन्स बिश्नोई गँगनं धमकी दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली. अगोदर बिश्नोई टोळीला संपवण्याची भाषा करणाऱ्या पप्पू यादव यांनी खुद्द बिहार पोलिसांचे दरवाजे ठोठावत सुरक्षेची मागणी केली. मात्र त्यांनी केलेल्या सुरक्षेच्या मागणीवर भाजपाचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मोठा हल्लाबोल केला. "अगोदर वैयक्तिक टीका करायची आणि नंतर पोलीस दलाकडं संरक्षणाची मागणी करायची ही काही लोकांची फॅशन झाली. अशा लोकांना संरक्षण देऊ नये," असं माझं सरकारला आवाहन आहे, असा हल्लाबोल ब्रिजभूषण सिंह यांनी केला.
ब्रिजभूषण सिंह (Reporter) कॅनडा सरकारनं दिवाळी साजरी करण्यावर घातली बंदी :दिवाळीनिमित्त कैसरगंजचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या विष्णोहरपूर इथल्या घरी समर्थकांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारत आणि कॅनडामध्ये सुरू असलेल्या वादावर त्यांनी भाष्य केलं. "कॅनडाच्या सरकारनं दिवाळी साजरी करण्यावर बंदी घातली आहे. पण ज्यांना दिवाळी साजरी करायची आहे ते करतील. कॅनडामध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. या बंदीचा भारताला काही फरक पडणार नाही. त्याचा फटका फक्त कॅनडालाच बसेल," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
अगोदर 24 तासात लॉरेन्स टोळीला संपवण्याची भाषा, मग पप्पू यादवांनी मागितलं संरक्षण; ब्रिजभूषण सिंहांचा संताप (Reporter) खासदार पप्पू यादव यांची उडवली खिल्ली :कॅनडाची मोठी अर्थव्यवस्था भारतावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताशी संबंध ताणल्याचा कॅनडाला मोठा फटका बसेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. लॉरेन्स बिश्नोई यांच्याबाबत विचारलं असता, त्यांनी अशा लोकांची नावं घेऊ नका असं सांगितलं. बिहारचे खासदार पप्पू यादव यांची त्यांनी यावेळी खिल्ली उडवली. आजकाल एखाद्यावर वैयक्तिक टिप्पणी करण्याची फॅशन झाली. एखाद्यावर टीका करायची आणि मग संरक्षण मागायचं. बाहुबली असो किंवा कोणताही नेता, कोणीही जात-धर्मावर भाष्य करू नये, असं त्यांनी यावेळी बजावलं.
अगोदर टीका केली, आता संरक्षण मागतात :ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, "आधी सलमान खान धमकी प्रकरणात खासदार पप्पू यादव यांनी टीका केली. आता मात्र ते सुरक्षेची मागणी करत आहेत. मी सरकारला अशा गोष्टी थांबवण्याचं आवाहन करतो. सरकारनं असं करणाऱ्या लोकांना कोणतंही संरक्षण देऊ नये. समाजात द्वेष पसरवणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- बॉलिवूडच्या भाईजानची पाचावर धारण; बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानची उडाली झोप, झिशान सिद्दिकींनी दिली 'ही' माहिती
- बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : मुंबई पोलिसांनी पंजाबमधून एका आरोपीला ठोकल्या बेड्या, रायगडमधून शस्त्र जप्त
- बाबा सिद्दीकी हत्याकांड : मारेकरी मेसेजिंग अॅपद्वारे होते अनमोल बिश्नोईच्या थेट संपर्कात, मुंबई पोलिसांचे धक्कादायक खुलासे