मोतिहारी BRIDGE COLLAPSE IN MOTIHARI:बिहारमध्ये एकापाठोपाठ एक पूल कोसळल्याच्या घटना घडत आहेत. अररिया आणि सिवाननंतर आता मोतिहारीमध्येही पूल कोसळला. बिहारमध्ये एका आठवड्यात पूल कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामुळे सरकारच्या कारभारावरचं प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. तसचं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय.
घोरासहन ब्लॉकच्या आमवा ते चैनपूर स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे ४० फूट पूल बांधण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे दीड कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येत आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतर्गत पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. पुलाची कास्टिंग केल्यानंतर शनिवारी रात्री अचानक पूल कोसळला. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे विकासकामांमधे भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे.
बिहार येथील मोतिहारी पूल कोसळला (ETV Bharat) रमा देवी यांनी केली होती पायाभरणी: मोतिहारीच्या धीरज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे १८ मीटर लांबीचा पूल बांधला जात आहे. गेल्या वर्षी १० मार्च रोजी भाजपाच्या खासदार शेओहर रमा देवी यांनी हस्ते या पुलाची पायाभरणी करण्यात आली होती.
समाजकंटकानी पूल तोडल्याचा अधिकाऱ्यांचा आरोप
- दोन स्पॅनमध्ये हा पूल बांधण्यात येत आहे. काल एका बाजूने पुलाचे कास्टिंग करण्यात आले. त्यानंतर रात्री समाजकंटक या ठिकाणी आले. त्यांनी पुलाचे मध्यभाग तोडले. यात कास्टब्रीज कोसळल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी एसएन मंडल कार्यकारी अभियंता आरडब्लूडू यांनी दिली.
नागरिकांना मनस्ताप -हा पूल ज्या दिशेला बांधायचा होता त्या दिशेने बांधला जात नसल्याची माहिती दीपक कुमार सिंह यांनी दिली. याशिवाय पुलाच्या बांघकामत वापरण्यात येणारा मालदेखील निकृष्ट दर्जाचा आहे. यामुळे उच्चस्तरीय चौकशी करणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितलं. सिवानमधील पूल शनिवारीच कोसळला होता. पूल कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. महाराजगंजच्या पाटेधा आणि गरौली गावांमध्ये पूल होता. पूल 40 ते 45 वर्षे जुना असून कालव्याच्या साफसफाईच्या वेळी हा पूल कोसळल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.
- अररियामध्ये पूल कोसळला: अरिया येथील बाकरा नदीवर बांधलेला पूल मंगळवारी कोसळला होता. 12 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला होता. या पूलाचं बांधकाम पूर्ण झालं होतं. मात्र, उद्धाटनापूर्वीच हा पूल कोसळला.
हेही वाचा
- बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोखले पुलाची जोडणी यशस्वी, 'या' तारखेपासून होणार वाहतूक सुरू - Barfiwala Flyover
- Railway Bridge Collapse In Mizoram : मिझोरममध्ये मृत्यूचं तांडव, रेल्वेचा निर्माणाधीन पूल कोसळून 17 मजुराचा मृत्यू