पणजी : भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी रविवारी गोव्यातील आयर्नमॅन ही अतिशय खडतर स्पर्धा पूर्ण केली. आयर्नमॅन ही स्पर्धा पुर्ण करणारे तेजस्वी सूर्या हे पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले आहेत. खासदार तेजस्वी सूर्या यांनी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. तेजस्वी सूर्या यांनी 70.3 चॅलेंज पूर्ण केलं. यात 2 किमी पोहणं, 90 किमी सायकलिंग आणि 21 किमी धावण्याचा समावेश आहे. तेजस्वी सूर्या यांनी हे आव्हान फक्त 8 तास, 27 मिनिटं आणि 32 सेकंदात पूर्ण केलं.
आयर्नमॅन स्पर्धेचं आव्हान पेलणारे तेजस्वी सूर्या पहिलेच खासदार :खासदार तेजस्वी सूर्या यांनी गोव्यात आयोजित आयर्नमॅन स्पर्धेत हा भीम पराक्रम केला. यावेळी स्पर्धेचे अॅम्बेसडर आणि खेळाडू लियांडर पेस, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक राज, स्पर्धा संचालक गणेशन व्ही एस आदी दिग्गजांची उपस्थिती होती. रविवारी गोव्यात आयोजित या स्पर्धेत खासदार तेजस्वी सूर्या यांनी यश मिळवलं. विशेष म्हणजे ही स्पर्धा पूर्ण करणारे तेजस्वी सूर्या हे पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले आहेत. ही स्पर्धा अतिशय खडतर असल्याचं मानलं जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक :खासदार तेजस्वी सूर्या यांनी आयर्नमॅन ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली, त्याब्बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल माध्यमातून तेजस्वी सूर्या यांचं अभिनंदन करत, "प्रशसनीय कामगिरी, मला खात्री आहे, की खासदार तेजस्वी सूर्या यांच्या या यशामुळे अनेक तरुण तंदुरुस्तीबाबत सजग होती. त्यांना तेजस्वी सूर्या यांच्या यशातून प्रेरणा मिळेल." असं आपल्या सोशल माध्यमांवर नमूद केलं आहे. खासदार तेजस्वी सूर्या यांनी आयर्नमॅन ही स्पर्धा यशस्वी पूर्ण केल्यानंतर आनंद व्यक्त केला. या स्पर्धेसाठी त्यांनी कठोर मेहनत घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे आयर्नमॅन स्पर्धेत 50 पेक्षा अधिक देशातील खेळाडू सहभागी होतात.
हेही वाचा :
- देशातील सर्वात मोठे युवा संमेलन 4 मार्च रोजी नागपुरमध्ये आयोजित करण्यात येणार - तेजस्वी सुर्या
- MP Tejswi surya on BMC : भाजप आणि शिंदे सरकार आल्यानंतर राज्याचे ग्रहण सुटले, मुंबई महापालिकेत भाजपच जिंकणार - भाजप खासदार तेजस्वी सूर्या
- Tejasvi Surya Criticizes: उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी नाही, ती आज वसुली सेना; तेजस्वी सुर्याची टीका