महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बांगलादेशातील परिस्थितीवर सरकारचं बारीक लक्ष; परराष्ट्र मंत्र्यांची माहिती, विरोधकांचा पाठिंबा - Bangladesh Crisis Updates - BANGLADESH CRISIS UPDATES

Bangladesh Crisis Updates : बांगलादेशातील परिस्थितीबाबत केंद्र सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक संसद भवन संकुलात पार पडली. बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना बांगलादेशातील परिस्थितीची माहिती दिली.

Bangladesh Crisis Updates
सर्वपक्षीय बैठक (Etv Bharat English DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 1:29 PM IST

Updated : Aug 6, 2024, 2:10 PM IST

नवी दिल्ली Bangladesh Crisis Updates : बांगलादेशातील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बांगलादेशमधील घडामोडींवर सरकार बारीक लक्ष ठेवून असल्याचं आश्वासन यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना दिलं. या बैठकीत बांगलादेशामध्ये उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबतही माहिती देण्यात आली. बैठकीत सर्व राजकीय पक्षांनी या प्रश्नावर सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचं आश्वासन दिलं.

८ हजार विद्यार्थी भारतात परतले : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशमध्ये २० हजार भारतीय असल्याची माहिती दिली, त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत. सरकारने ॲडव्हायजरी जारी केल्यानंतर त्यातील ८ हजार विद्यार्थी भारतात परतले आहेत. सरकार बांगलादेश सैन्याच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितलं. तिथली परिस्थिती सतत बदलत असते आणि जसजसा बदल होईल त्याबाबतची माहिती सरकार पुन्हा घेणार असल्याचं एस जयशंकर म्हणाले.

शेख हसीना गाझियाबादच्या सेफ हाऊसमध्ये उपस्थित? : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या काही तासांपासून गाझियाबादच्या हिंडन हवाई तळावर असलेल्या भारतीय हवाई दलाच्या सेफ हाऊसमध्ये उपस्थित आहेत, अशी माहिती मिळत आहे. हिंडन एअरफोर्स स्टेशनच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शेख हसीना यांचे विमान सोमवारी संध्याकाळी ५.३६ वाजता हिंडन एअरबेसवर उतरलं, असं सांगण्यात आलं होतं. हिंडन एअरबेसबाहेर व्हीव्हीआयपींची वर्दळ वाढली होती. एअरफोर्स स्टेशनच्या मुख्य गेटमधून दोन वाहने आत आली. दोन्ही वाहनांवर भारत सरकार असं लिहिलं होतं. मात्र, दोन्ही वाहनांमध्ये कोणते अधिकारी उपस्थित होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

बांगलादेशचं विमान परतलं : शेख हसीना यांना भारतात आणणारं बांगलादेश हवाई दलाचं विमान सकाळी ९ वाजताच्या सुमारास बांगलादेशमध्ये परतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख हसीना, बहीण रिहाना आणि इतर कुटुंबीय हिंडन एअरफोर्स स्टेशनवर हजर आहेत. बांगलादेशात अराजकता वाढली असून कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळं बांगलादेशच्या तुरुंगात बंद असलेले अनेक कैदी पळून गेले आहेत, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, या सर्व घटनाक्रमांना अधिकृत पृष्टी मिळाली नाही.

हेही वाचा -

  1. “शेख हसीना यांनी लोकशाहीचा मुखवटा घालून...”: बांगलादेशमधील परिस्थितीबाबत संजय राऊतांचं विधान, केंद्राला दिला इशारा - Sanjay Raut on Bangladesh Protest
  2. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान भारतात दाखल, इंग्लंडकडं मागितला राजाश्रय - Bangladesh crisis protest update
  3. बांगलादेशमध्ये संपूर्ण देशात उसळला हिंसाचार, शेख हसीनांच्या 'त्या' निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप - BANGLADESH PROTEST 2024
Last Updated : Aug 6, 2024, 2:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details