महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Badaun Childrens Murder: आरोपीनं दोन चिमुकल्यांचा खून का केला, वाचा बदायू खून प्रकरणाची 'इनसाईड स्टोरी' - Badaun Childrens Murder

Badaun Childrens Murder : उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये दोन मुलांची हत्या आणि एका मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी साजिद चकमकीत ठार झालाय. डोकं दुखत असल्याचं सांगून घरात घुसून टेरेसवर जाऊन ही हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय.

Badaun Childrens Murder: आरोपी चहा पिण्यासाठी घरी आला अन् दोन चिमुकल्यांचा खून केला, बदायू खून प्रकरणाची 'इनसाईड स्टोरी'
Badaun Childrens Murder: आरोपी चहा पिण्यासाठी घरी आला अन् दोन चिमुकल्यांचा खून केला, बदायू खून प्रकरणाची 'इनसाईड स्टोरी'

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 9:36 AM IST

बदायू (उत्तर प्रदेश) Badaun Childrens Murder : उत्तर प्रदेशातील बदायूच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन परिसरातील चौकी मंडई समितीपासून दीडशे मीटर अंतरावर सलूनचं दुकान चालविणाऱ्या साजिद नावाच्या तरुणानं दुकानाजवळील घरात घुसून धारदार शस्त्रानं दोन चिमुकल्यांची गळा चिरुन हत्या केली. यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी आरोपीच्या दुकानाला आग लावली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी साजिदला घेरून चकमकीत ठार केलं.

आरोपी हा चिमुकल्यांच्या घरात खूप ये-जा करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. घटनेच्या रात्री डोकेदुखी होत असल्याचं सांगून तो चहा पिण्यासाठी घरी आला. यानंतर तो गच्चीवर झोपतो असं सांगून निघून गेला. काही वेळानं त्यानं गच्चीवर खेळणाऱ्या तीन मुलांवर वस्तरानं हल्ला केला. यात दोन मुलांचा मृत्यू झाला. तर एक मुलगा जखमी झाला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी साजिदचा भाऊ जावेद याचंही नाव घेतलं असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दोन मुलांचा मृत्यू एक जण जखमी : बदायूच्या पोलीस स्टेशन सिव्हिल लाईनच्या मंडी समिती चौकीजवळ तीन चिमुकले त्यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर खेळत होते. रात्री आठ वाजता आरोपी साजिदनं टेरेसवर येऊन तीन मुलांवर वस्तरानं हल्ला केला. यानंतर आजीनं आरडाओरडा केला असता आरोपी पळून गेला. लोकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला घेराव घातला. यानंतर पोलिसांनी आरोपींना घेरलं आणि चकमक सुरु झाली. यातच गोळी लागल्यानं आरोपी साजिदचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तेनात : पोलिसांच्या चौकशीत मुलांच्या आजीनं सांगितलं की, आरोपी अनेकदा घरी येत असे. घटनेच्या रात्री आठ वाजता तो डोकेदुखी होत असल्याचं सांगून घरी आला. त्यानं चहा देण्याची विनंती केली. चहा पिऊन तो गच्चीवर झोपतो, असं सांगून निघून गेला. काही वेळातच त्यानं दोन्ही मुलांचा जीव घेतला. गच्चीवरील एका मुलाला जखमी केलं. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. त्याचवेळी मुख्यमंत्री योगी यांनी या घटनेबाबत अधिकाऱ्यांना गुंडांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस या संपूर्ण हत्येचा तपास करत असून घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

हेही वाचा :

  1. Barber Kills Two Children In Badaun : दोन चिमुकल्यांचा गळा चिरुन खून ; पोलिसांनी नराधमाला घातलं कंठस्नान

ABOUT THE AUTHOR

...view details