महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रेमापोटी केलं तान्ह्या बाळाचं अपहरण आणि लागला लळा, सव्वा वर्षानंतर मूल आईलाही विसरलं, व्हिडिओ आला समोर - Kidnapper Child Bonding

Kidnapper Child Bonding - राजस्थानमध्ये अपहरण केलेल्या एका चिमुकल्याच्या अपहरणाची हृदयस्पर्षी गोष्ट सध्या गाजत आहे. जयपूर पोलिसांनी या अपहरणाच्या घटनेचा छडा लावत 14 महिन्यांनंतर आईपासून विभक्त झालेल्या एका निष्पाप मुलाला कुटुंबाला सोपवलं. मात्र हा मुलगा चक्क आपल्या आईलाच ओळखत नव्हता. या मुलाचं वयाच्या 11 महिन्यातच अपहरण करण्यात आलं. नंतर काय झालं वाचा सविस्तर वृत्त...

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2024, 7:25 PM IST

जयपूर Kidnapper Child Bonding :राजस्थानच्या जयपूर पोलिसांनी बुधवारी राजधानीत १४ महिन्यांपूर्वी घडलेल्या अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणला. तब्बल 11 महिन्यांच्या मुलाचं घराबाहेरून अपहरण केल्याचा आरोप असलेल्या बहाद्दराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. हा अपहरणकर्ता उत्तर प्रदेश पोलिसात हेड कॉन्स्टेबल होता. त्याला निलंबित करण्यात आलं होतं. आरोपी तनुज चहर हा आता पोलिसांच्या ताब्यात आहे. या तनुजला पकडून देणाऱ्यास २५ हजारांचं बक्षीसही लावण्यात आलं होतं. आता तनुज पोलिसांच्या ताब्यात असला तरी त्यानं अपहरण केलेल्या मुलाला त्याचा एवढा लळा लागला होता की या १४ महिन्यांत या मुलाला आपला मुलगा मानायला त्यानं सुरुवात केली. मुलालाही त्याचा चांगलाच लळा लागला होता.

तान्ह्या बाळाचं अपहरण... आणि लागला लळा... (ETV Bharat Jaipur)

नुकताच या घटनेचा खुलासा झाल्यानंतर जयपूर पोलिसांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये पोलीस जेव्हा आरोपी तनुजकडून मुलाला घेऊन आईच्या स्वाधीन करण्यासाठी जातात, तेव्हा अपहरण झालेलं मूल आईलाच ओळखत नाही. 25 महिन्यांचा हा बाळ पृथ्वी, आरोपीला मिठी मारून जोरजोरात रडू लागला आणि त्याला सोडायला तयार नाही. मुलाला रडताना पाहून अपहरणकर्त्याच्याही डोळ्यात पाणी आलं.

'हे' होतं अपहरणामागचं कारण :जयपूर दक्षिणचे अतिरिक्त डीसीपी पारस जैन यांनी सांगितलं की, आरोपी तनुज चहरला अपहरण झालेल्या मुलाची पृथ्वीची आई पूनम चौधरी आणि पृथ्वी उर्फ ​​कुक्कूला आपल्यासोबत ठेवायचं होतं. परंतु पूनमला आरोपीसोबत जायचं नव्हतं. त्यामुळे तनुजने त्याच्या साथीदारांसह 14 जून 2023 रोजी 11 महिन्यांच्या पृथ्वीचं अपहरण केलं. या घटनेनंतरही आरोपी हेड कॉन्स्टेबल तनुज पूनमवर सतत दबाव आणत होता. ज्यामुळे तिला यूपी पोलिसातील नोकरी गमवावी लागली होती.

पोलिसांना पाहताच आरोपीनं काढला पळ : ओळखीच्या मुलाचं अपहरण केल्याचा आरोप असलेल्या तनुज चहरला अटक करण्यासाठी जयपूर पोलिसांचं एक विशेष पथक 22 ऑगस्टला मथुरा, आग्रा आणि अलीगढ येथे पोहोचलं होतं. तनुजने दाढी वाढवली असून त्यानं साधूची वस्त्रं परिधान केली होती आणि वृंदावन परिक्रमा मार्गावरील युमनेच्या एका भागात एका झोपडीत राहात असल्याची माहिती मिळाली होती. आरोपीला पकडण्यासाठी जयपूरचे पोलीसही तेथे साधूंच्या वेशात भजन आणि कीर्तन करत राहू लागले. 27 ऑगस्टला तनुज अलीगडला गेल्याची माहिती मिळताच पोलीस आरोपीला पकडण्यासाठी पोहोचले. त्यानंतर तो अपहृत मुलाला घेऊन शेतात पळू लागला. मात्र पोलिसांनी सुमारे 8 किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडलं.

हेही वाचा..

  1. 'भारतात दररोज 172 मुली होतात बेपत्ता; 170 जणांचं होते अपहरण, जाणून घ्या जागतिक मानवी तस्करीबाबत धक्कादायक माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details