नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीतील करोलबाग परिसरात 'पदयात्रा' आयोजित केली. या पदयात्रेत त्यांनी राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था भाजपानं बिघडवल्याचा हल्लाबोल केला. "दिल्ली पोलीस जर 'आप'च्या अखत्यारित असते तर आम्ही रुग्णालय, शिक्षण विभागासह इतर ठिकाणी सुधारणा केली, तशी कायदा आणि सुव्यवस्थाही सुधारली असती," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
राजधानीत कायदा आणि सुव्यवस्था ढासळली :अरविंद केजरीवाल यांनी राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन भाजपावर मोठी टीका केली. "दिल्लीत सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे मी खूप चिंतेत आहे. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिल्लीत फिरताना मला नागरिकांमध्ये भीतीचं सावट दिसून आलं. मी जातो तिथं नागरिक भीती व्यक्त करतात, असा हल्लाबोल अरविंद केजरीवाल यांनी केला. मी माझ्यावर जनतेनं सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या 'पूर्ण' केल्या. दिल्लीतील नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यात मात्र भाजपाला मात्र अपयश आलं आहे. शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडं तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे."
पोलिसावर झाडल्या गोळ्या, नागरिकाची हत्या :यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, "शहरातील शहादरा येथील विश्वास नगरमध्ये एका व्यावसायिकावर पायी फिरून परतत असताना गोळ्या झाडण्यात आल्या. त्याचप्रमाणं गोविंदपुरी इथं एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. एका आठवड्यापूर्वी याच भागात एका पोलिसाची हत्या झाली. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचं या घटनांवरुन स्पष्ट झालं. तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं, तुम्ही मला शाळा, रुग्णालयं आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यास सांगितलं. मी ते केलं," असही अरविंद केजरीवाल म्हणाले. "भाजपावर सुरक्षा पुरवण्याची एकच जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र ते सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे दिल्ली अराजकतेच्या स्थितीत आहे. दिल्लीतील एकही माणूस सुरक्षित वाटत नाही. दिल्ली पोलीस आमच्या नियंत्रणात नाहीत, नाहीतर आम्ही त्यांना सूतासारखं सरळ केलं असतं," असही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- Kejriwal bungalow renovation case : मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, बंगला नूतनीकरण प्रकरणाचा सीबीआय तपास सुरू
- आपच्या आणखी चार नेत्यांना अटक होणार, भाजपाकडून मला ऑफर... आतिशी यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप - Aap minister Atishi
- Arvind Kejariwal To Meet Sharad Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज घेणार शरद पवारांची भेट