नवी दिल्ली: शाहदरा जिल्ह्यातील विश्वकर्मा नगर भागात शनिवारी रामलीलाच्या कार्यक्रमात एका कलाकाराचा मृत्यू झाला आहे. सुशील कौशिक (45 वर्ष) असं मृत कलाकाराचं नाव आहे. ते विश्वकर्मा नगर येथील रहिवासी होते. रामलीलामध्ये ते 'श्री रामाच्या' भूमिकेत होते. ते व्यवसायाने ते प्रॉपर्टी डीलर होते. यावेळी ते जय श्री रामलीला कमिटी झिलमिल विश्वकर्मा नगरमध्ये प्रभू रामाची भूमिका करत होते.
हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू :वास्तविक शनिवारी रात्री अनेक कलाकार मंचावर रामलीला रंगवत होते. यावेळी सुशील कौशिक यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सुशील कौशिक यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यामध्ये रामलीलामधील पात्र साकारताना दिसत आहेत. त्रास होत असताना ते अचानक नाट्यमंचाच्या मागे गेले. तेथेच बेशुद्ध पडले.
- राम बोध घाटावर अंत्यसंस्कार :सुशील यांच्यावर रविवारी ज्वाला नगर येथील राम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लवकुश रामलीलामधील एका कलाकाराची प्रकृती शुक्रवारीही बिघडली होती. स्टेजिंग दरम्यान ते बेशुद्ध पडले होते. दिल्लीत नवरात्रीनिमित्त विविध भागात रामलीलाचं आयोजन केलं जात आहे. ते पाहण्यासाठी लोक दूरदूरहून येत आहेत.