नवी दिल्ली Coaching Centre Sealed In Delhi : राजधानी दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये पाणी भरल्यानं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील प्रशासन कामाला लागलं आहे. दिल्ली महापालिकेच्या महापौर शैली ओबेरॉय यांनी या कोचिंग सेंटरवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणारे 13 कोचिंग सेंटर सील करण्यात आले आहेत. राजेंद्र नगरमधील ही 13 कोचिंग सेंटर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गरज पडल्यास संपूर्ण दिल्लीत ही मोहीम राबवण्यात येईल, अशी माहितीही महापालिका सूत्रांनी दिली आहे.
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोचिंग सेंटरवर कारवाई :कोचिंग सेंटरमध्ये पाणी साचण्याचं कारण शोधण्यासाठी एमसीडीनं सखोल तपास सुरू केला आहे. करोलबाग परिसरात नियमांच्या उल्लंघनासाठी 13 मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. रविवारी संध्याकाळी उशिरा महानगरपालिका प्रशासनानं ही माहिती दिली. मालमत्तेच्या मालकाकडं सर्व आवश्यक कागदपत्रं आहेत. कोचिंग सेंट्रच्या मालकांनी तळघर वापराबाबत बांधकाम उपनियमांचं उल्लंघन केलं आहे. तळघरात पार्किंग आणि स्टोरेजसाठी परवानगी होती. त्यामुळे तळघर वाचनालय आणि वाचनगृह म्हणून वापरण्यास परवानगी नव्हती, अशी माहिती पुढं आली आहे.
कोचिंग सेंटरमधील गाळ काढण्याचं काम :महापालिका परिसरातील सर्व भागातील बांधकाम नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोचिंग सेंटरवर कठोर कारवाई करत आहे. एमसीडीनं रविवारी असं नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सात मालमत्ता सील केल्या. तर करोलबाग झोनमध्ये निर्जंतुकीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. कोचिंग सेंटर चालकांनी इमारत उपविधी आणि अग्निशमन दलाची एनओसी घेणं बंधनकारक आहे. ते घेण्याची जबाबदारी इमारत मालकाची असल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं.
कोचिंग सेंटरचं प्रकरण पोहोचलं उच्च न्यायालयात :यूपीएसएसी कोचिंग संस्था असलेल्या आरएयूएस आयएएस स्टडी सर्कलच्या तळघरात झालेल्या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे घटनेची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. राष्ट्रीय प्रवासी मंचच्या वतीनं वकील एपी सिंह यांनी ही याचिका दाखल केली. या याचिकेत दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. तीन मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना पुरेशी भरपाई देण्याची मागणीही वकील एपी सिंह यांनी केली. दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि खबरदारी घेण्यासाठी उच्च न्यायालयानं दिल्ली महापालिकेला मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आदेश दिले आहेत.
- आईएएस गुरुकुल
- चहल अकादमी
- प्लूटस अकादमी
- साई ट्रेडिंग
- आईएएस सेतु
- टॉपर्स अकादमी
- दैनिक संवाद
- सिविल डेली आईएएस
- करियर पावर
- 99 नोट्स
- विद्या गुरु
- गाइडेंस आईएएस
- ईजी ऑफ आईएएस
हेही वाचा :
- आयएएस होण्याच्या स्वप्नावर फिरलं पाणी, स्टडी सेंटरमधील पावसाच्या पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू - RAJENDRA NAGAR WATERLOGGING