हैदराबाद 78th Independence Day : हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये गुरुवारी 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला. 'ईनाडू'चे व्यवस्थापकीय संचालक सीएच किरण यांनी यावेळी ध्वजारोहण केलं. मार्गदर्शीचे व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण, आरएफसीच्या व्यवस्थापकीय संचालक विजयेश्वरी, ईटीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बापीनिडू के, रामोजी समूह मानव संसाधनचे (एचआर) अध्यक्ष गोपाल राव, ईनाडू तेलंगणाचे संपादक डीएन प्रसाद, आरएफसीचे संचालक शिवरामकृष्ण, विविध विभागांचे प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
रामोजी फिल्म सिटी :रामोजी फिल्म सिटी हे सुट्टी घालवणाऱ्यांसाठी स्वप्नवत ठिकाण आहे. 2000 एकरांवर पसरलेलं हे भव्य पर्यटन स्थळ एक प्रकारचे चित्रपट-प्रेरित थीमवर आधारित पर्यटन स्थळ मानलं जातं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं याला जगातील सर्वात मोठे फिल्म सिटी म्हणून मान्यता दिलीय. दरवर्षी सुमारे 200 फिल्म युनिट्स रामोजी फिल्मसिटीमध्ये त्यांची सेल्युलॉइड स्वप्नं साकार करण्यासाठी येतात. या ठिकाणी जवळपास भारतीय भाषांमधील 2500 हून अधिक चित्रपटांचं चित्रीकरण झालंय.
- दरम्यान, आज देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केलं.