भोपाळ World Book Of Records: मुली आता सर्व प्रकारच्या उपक्रमात सहभागी होत असून शिक्षण, राजकारण, मीडिया, लोकसेवा, कला, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान आदी क्षेत्रातही पुढंच आहेत. छिंदवाडा येथील प्रिया-मनीष बंडेवार यांची कन्या कुमारी समृद्धी बंडेवार हिचं 26 सप्टेंबर 2023 रोजी वयाच्या अवघ्या 50 दिवसात विविध सरकारी आणि अत्यंत जीवन उपयोगी कागदपत्रं बनवून, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनमध्ये आपलं नाव नोंदवल्याचं प्रमाणपत्र सरकारला प्राप्त झालंय. या विक्रमाची नोंद झाल्यामुळं समृद्धी बंडेवार सर्वाधिक 36 कागदपत्रं असणारी जगातील सर्वात लहान मुलगी बनलीय. प्रिया-मनीष बंडेवार यांनी त्यांची मुलगी कुमारी समृद्धी बंडेवार हिच्यासाठी केलेल्या या अद्भूत आणि प्रशंसनीय कार्याबद्दल जिल्हाधिकारी मनोज पुष्प यांनी स्वतः आणि मध्य प्रदेश सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीनं तिच्या कुटुंबीयांचं अभिनंदन केलंय. यासोबतच कुमारी समृद्धी बंडेवारला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी दिलेलं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं.
आवश्यकतेपूर्वी कागदपत्रं तयार करा येणार नाही कोणतीही अडचण : समृद्धीचे वडील मनीष यांनी याबाबत सांगितलं की, "आता आमच्याकडं निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडासह एकूण 36 कागदपत्रं आहेत. सुभेदार नरेंद्र सिंग बेस मेमोरियल फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेश पोलिसांचे डीएसपी प्रदीप वाल्मिकी यांनी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स यूके लंडनला केलेल्या विशेष शिफारसीच्या आधारे, आमच्या मेहनतीला फळ मिळालं आणि आम्ही वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरलंय. ही जीवनोपयोगी कागदपत्रं बनवून आम्ही सरकारी योजनांच्या माध्यमातून समाजात मुलींचा सन्मान वाढवला आणि तिला सक्षम केलंय, जे इतरांसाठीही प्रेरणादायी ठरु शकतं." त्यांनी मुलींच्या माता आणि वडिलांना त्यांच्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी, सन्मानासाठी आणि भविष्यासाठी तयार केलेली सर्व सरकारी कागदपत्रं मिळवून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्याचं आवाहनही केलंय.