हैदराबाद : भूकंपाच्या तिव्र धक्क्यानं तेलंगाणा हादरलं असून भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगाणातील मुलुगु इथं असल्याचं राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं ( National Center for Seismology ) नमूद केलं आहे. भूकंपाच्या धक्क्यानं तेलंगाणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड आदी राज्यातही हादरे बसले. महाराष्ट्रातील नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आदी परिसरात मोठा हादरा बसल्यानं नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली. हैदराबादेतील परिसरातही भूकंपाचा धक्का बसल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
मुलुगु इथं भूकंपाचा जोरदार धक्का :तेलंगणातील मुलुगु इथं बुधवारी सकाळी 7:27 वाजता 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, असं नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे. मुलुगु हे शहर हैदराबादपासून 250 किलोमीटर अंतरावर आहे. इथल्या नागरिकांना सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्यानं त्यांच्यात मोठी दहशत पसरली. मात्र या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.
हैदराबादसह परिसर भूकंपानं हादरला :आज सकाळी हैदराबाद आणि परिसरात भूकांपामुळे मोठा हादरा बसला. जमीन हादरल्यानं अगोदर काय होतेय, याबाबत नागरिकांना काही कळलं नाही. मात्र त्यानंतर हा हादरा भूकंपाचा असल्याचं स्पष्ट झाल्यानं नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली. हैदराबाद शहरासह परिसरातील शहरात भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. या भुकंपाचा केंद्रबिंदू मुलुगु असलं तरी त्याचा हादरा महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातही त्याचे धक्के जाणवले.
महाराष्ट्रातील सीमावर्ती भाग भूकंपानं हादरला :आज सकाळी तेलंगाणातील मुलुगु इथं भूकंपाचा जोरदार धक्का बसल्यानं मोठी दहशत पसरली आहे. या भूकंपाची रिश्टल स्केलवर तिव्रता 5.3 इतकी नोंदवण्यात आली आहे. तेलंगाणातील मुलुगु इथं भूकंपाचं केंद्र असलं, तरी त्याचा हादरा तेलंगाणासह महाराष्ट्रातही जाणवला. महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूरसह नागपूर, नांदेड आदी सीमावर्ती परिसरातही भूकंपाचा हादरा बसला. त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली.
हेही वाचा :
- नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिक घाबरुन आले रस्त्यावर
- अमरावती जिल्ह्याला भूकंपाचे धक्के; 4.2 रिश्टर स्केल इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण - Earthquake in Amravati
- हिंगोलीत चार वर्षात भूकंपाचे 25 धक्के; भूकंपामुळं नासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हादरे? - NASA Ligo LAB Project