महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चीनचा मोठा घोटाळा ईडीकडून उघडकीस! ४०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात ४ जणांना अटक, २५ कोटी जप्त - GAMING APP SCAM CASE - GAMING APP SCAM CASE

GAMING APP SCAM CASE: गेमिंगद्वारे चिनी वंशाच्या नागरिकांनी भारतात मोठा घोटाळा केला असून, सुमारे 400 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच हा सगळा पैसा चीनमध्ये पोहोचला आहे.

File Photo
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 4:36 PM IST

नवी दिल्ली GAMING APP SCAM CASE:-चीनने आता भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाईट नजर टाकण्यास सुरुवात केली आहे. ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने चीनचा भारताविरुद्धच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. चीन आता ऑनलाइन गेमिंगला आपले शस्त्र बनवत आहे. याद्वारे भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. खरं तर ईडीने चिनी ऑनलाइन गेमिंग ॲप्सवर मोठी कारवाई केली आहे. पहिल्यांदाच ED ने ऑनलाइन गेमिंग ॲप FIEWIN शी संबंधित चिनी नागरिकांची क्रिप्टो खाती गोठवली आहेत. तपास यंत्रणेने चिनी नागरिकांकडून 25 कोटी रुपये जप्त केले आहेत. या गेमिंग ॲपद्वारे भारतातून ४०० कोटी रुपये चीनमध्ये पोहोचल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले आहे.

या प्रकरणी ईडीने भारतातील चार नागरिकांनाही अटक केली आहे. गेमिंगद्वारे चिनी नागरिकांनी भारतात मोठा घोटाळा केला असून, सुमारे 400 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच हा सगळा पैसा चीनमध्ये पोहोचला आहे. ईडीने तीन चिनी नागरिकांची 3 क्रिप्टो खाती गोठवली आहेत. चीनने गेमिंग ॲप्सच्या माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचे मोठे षडयंत्र रचले होते. परंतु ईडीने चीनच्या 400 कोटींच्या गेमिंग ॲपच्या कटाचा पर्दाफाश केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने या गेमिंग ॲपच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी छापे टाकले होते आणि काही भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या गेमिंग ॲपच्या माध्यमातून भारताचे 400 कोटी रुपये चीनमध्ये कसे पोहोचले हे उघड झाले. फीविन ॲपवर आधारित ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग अॅप फसवणूकप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

16 मे 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता : विशेष म्हणजे या प्रकरणी यापूर्वी 16 मे 2023 रोजी कोलकाता येथील कोसीपोर पोलीस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम 420, 406 आणि 120B अंतर्गत ऑनलाइन गेमिंग ॲप FIEWIN द्वारे फसवणूक आणि कट रचल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईडीने पीएमएलए अंतर्गत तपास केला असता चिनी नागरिक भारतीय नागरिकांच्या मदतीने हे ॲप चालवत असल्याचे उघडकीस आले. FIEWIN ॲपद्वारे ऑनलाइन गेमर्सकडून गोळा केलेले पैसे एकाधिक व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये जमा केले गेले. त्या बदल्यात ॲप मालक रिचार्जसाठी कमिशन देत होते. ओडिशाचे रहिवासी अरुण साहू आणि आलोक साहू यांनी "रिचार्ज करणाऱ्या व्यक्ती" म्हणून काम केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. FIEWIN ॲपद्वारे त्यांच्या बँक खात्यात आलेले पैसे क्रिप्टो चलनात रूपांतरित केले गेले आहेत. त्यांनी FIEWIN ॲपवरून कमावलेले क्रिप्टो चलन परदेशी क्रिप्टो एक्सचेंज म्हणजेच Binance वर चिनी नागरिकांच्या वॉलेटमध्ये जमा केले आहेत.

बिहारमध्ये क्रिप्टो चलन बदलण्यात आले :बिहारमधील पाटणा येथील अभियंता चेतन प्रकाश यांनी क्रिप्टो करन्सी (USDT) मध्ये पैसे रूपांतरित करण्यात अशा व्यक्तींना मदत करून मनी लाँड्रिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचं उघड झालंय. जोसेफ स्टॅलिन नावाच्या आणखी एका व्यक्तीने गांसू प्रांतातील पाय पेंग्युन नावाच्या एका चिनी नागरिकाच्या स्टुडिओ 21 Pvt. Ltd. च्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले आणि ते बँक खाते ॲपशी संबंधित मोठे पेमेंट करण्यासाठी वापरले जात होते. खरं तर सुरुवातीला गेमर्सचा विश्वास मिळविण्यात त्यांना मदत झाली आणि ॲप वापरकर्त्यांना मोठ्या बेट लावण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. जोसेफ स्टॅलिन याने चिनी हँडलर्सचे नियंत्रण असलेल्या वॉलेटमधून क्रिप्टो चलनाच्या स्वरूपात व्यवहाराचे पैसे त्याच्या Binance खात्यात वळवले. त्या बदल्यात त्याने Binance वर P2P मोडद्वारे क्रिप्टोची विक्री करून USDT क्रिप्टो चलन रुपयांमध्ये रूपांतरित केले.

4 आरोपींना अटक करण्यात आली:फीविन ॲपवर आधारित फसवणूक करून सुमारे 400 कोटी रुपयांची फसवणूक केली गेली आहे आणि ही रक्कम चिनी नागरिकांच्या नावावर आठ Binance वॉलेटमध्ये जमा करण्यात आली होती. तसेच ही खाती चीनमधून चालवली जात होती, असंही ऍक्सेस आयपी लॉगमधून उघड झाले आहे. चिनी नागरिक अरुण साहू, आलोक साहू, चेतन प्रकाश, जोसेफ स्टॅलिन यांच्याशी टेलिग्रामद्वारे संपर्क साधायचे आणि या चौघांचाही घोटाळ्यात सक्रिय सहभाग आहे. या सर्व 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फीविन अॅप हे गेमिंग अॅप आहे. त्याच्यामार्फत जे पैसे कमावतात, ते क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून भारताच्या बाहेर नेले जातात. खरं तर हे फेरा आणि फेमा कायद्याचं उल्लंघन असून, भारताला करापासून वंचित करते. यातून खूप सारा काळाबाजार होतो. प्रत्येक चायनीज व्यवसाय भारतात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होतो. यावरती भारत सरकारने नजर ठेवणे गरजेचे आहे. तसेच यांच्याकडून कर वसूल करणे आवश्यक आहे. यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यावर मोठी कारवाई होऊन निर्णय येणे आवश्यक आहे. यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. म्हणून हे काळाबाजाराच्या धंद्यांमध्ये जास्त करून सहभागी असतात.

प्रशांत माळी, सायबर तज्ज्ञ

हेही वाचाः

'इंटेल' संगणक प्रोसेसर उत्पादक कंपनी Qualcomm घेण्याच्या तयारीत; नेमका करार काय? - Intel Probability of Bankruptcy

भारताच्या स्टार्टअप्सवर कर्जाचा बोजा : कसं निघणार रुतलेलं चाक वर... - INDIA STARTUPS


ABOUT THE AUTHOR

...view details