महाराष्ट्र

maharashtra

अभिनेत्री दिशा पाटणीने खास शब्दात दिल्या मोहित सुरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

By

Published : Apr 11, 2020, 8:59 PM IST

Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST

दिग्दर्शक मोहित सुरी यांचा शनिवारी ३९ वा वाढदिवस आहे. या दिवशी खास शब्दामध्ये अभिनेत्री दिशा पाटणीने शुभेच्छा दिल्या आहेत.

disha-patani-pens-special-birthday-note
अभिनेत्री दिशा पाटणी

मुंबई - अभिनेत्री दिशा पाटणी हिने 'मलंग' चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, ''आश्चर्यकारक व्यक्ती'', असं लिहिलंय.

दिशाने आपल्या इन्स्टाग्रामवर काही सुरी यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर तिने सुरी यांना सोशल मीडियावरुन प्रेम व्यक्त केलंय.

दिशा पाटणीने खास शब्दात दिल्या मोहित सुरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

''सर्वात आश्चर्यकारक दिग्दर्शक आणि माणूस असलेल्या मोहित सुरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. अजून पुढे, आश्चर्यकारक वर्षे आहेत, सर. मोहित सुरी सर, मी नेहमीच तुमच्यावर भरपूर प्रेम करते,'' असे दिशा पाटणीने म्हटले आहे.

दिशाने आणखी एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. यात ती मोहित सुरींसोबत पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत सुरी हे तिला काही तरी समजावून सांगताना दिसत आहेत.

'मलंग' हा चित्रपट ७ फेब्रुवारीला रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने चांगली कमाई केली होती. या चित्रपटात तिच्यासह आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

Last Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details