ETV Bharat / entertainment

जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ अभिनित 'वेदा' चित्रपटाचा ट्रेलर 'या' तारखेला होईल रिलीज - vedaa trailer release date - VEDAA TRAILER RELEASE DATE

Vedaa Trailer: जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांच्या 'वेदा' चित्रपटाचा ट्रेलर हा रिलीज होणार असल्याची अपडेट आलीय. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक नवीन टीझर रिलीज केलंय.

Vedaa Trailer
वेदा चित्रपट ट्रेलर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 6:47 PM IST

मुंबई - Vedaa Trailer : बॉलिवूड अभिनेता 'जॉन अब्राहम' आणि 'शर्वरी वाघ' स्टारर ॲक्शन चित्रपट 'वेदा' आजपासून 15 दिवसांनी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. जॉनचे चाहते चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत. आता 'वेदा'चा ट्रेलर हा लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आलीय. 'वेदा' या चित्रपटाची घोषणा यावर्षी झाली होती. या चित्रपटामधील फर्स्ट लूक पोस्टर्स समोर आल्यानंतर अनेकांना पुन्हा एकदा जॉनला अ‍ॅक्शन अवतारात पाहायचं असल्याचं म्हटलं होतं. या चित्रपटामध्ये शर्वरी वाघचे देखील अ‍ॅक्शन सीन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

'वेदा'चा ट्रेलर कधी रिलीज होणार? : नुकतेच, सेन्सॉर बोर्डानं 'वेदा' चित्रपटाला कोणतेही कट न मारता, यूए प्रमाणपत्र दिलं आहे. 'वेदा'च्या निर्मात्यांनी आज (31 जुलै) रोजी ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर करत चित्रपटामधील एक छोटीशी झलक दाखवली आहे. 'वेदा'चा ट्रेलर उद्या म्हणजेच (1ऑगस्ट) रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये जॉन हा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. शर्वरी पहिल्यांदाचं जॉनबरोबर स्क्रिन शेअर करत आहे. त्यामुळं ती खूप उत्साहित असल्याचं तिनं पोस्टद्वारे म्हटलं होतं. या चित्रपटात जॉन आणि शर्वरी व्यतिरिक्त अभिषेक बॅनर्जी आणि तमन्ना भाटिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'वेदा' चित्रटाबद्दल : या चित्रपटात शर्वरी (वेदा) आणि जॉन अब्राहम (अभिमन्यू ) भूमिकेत दिसणार आहेत. 'वेदा' चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केलय. हा चित्रपट झी स्टुडिओज, जेए एंटरटेनमेंट प्रस्तुत करत आहे. 'वेदा' चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. दरम्यान जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती नुकचीच 'मुंज्या' या चित्रपटामध्ये अभय वर्माबरोबर दिसली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. आता पुढं ती आलिया भट्टबरोबर यशराज स्पाय युनिव्हर्सच्या 'अल्फा' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दुसरीकडं जॉन हा 'हाउसफुल 5', 'वॉर 2', 'राख' आणि 'तेहरान' चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ स्टारर 'अल्फा'चं शूटिंग सुरू, पोस्ट व्हायरल - sharvari wagh and alia bhatt
  2. Vedaa teaser released : जॉन अब्राहम, शर्वरी वाघ, तमन्ना भाटिया स्टारर 'वेदा'चा टीझर रिलीज
  3. जॉन अब्राहम स्टारर 'वेदा'ला सेन्सॉर सर्टिफिकेट न मिळाल्यानं निर्मात्यांचे धाबे दणाणले - John Abrahams Vedaa

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.