ETV Bharat / snippets

कळसुबाई शिखरावर चढताना ह्रदयविकाराचा आला झटका, गुजरातच्या पर्यटकाचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 1:27 PM IST

Kalsubai Peak
मृतक नेमीन नरेशभाई पटेल (ETV Bharat Reporter)

अहमदनगर Kalsubai Peak: महाराष्ट्राचं एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखरावर चढताना एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा पर्यटक गुजरातमधील बलसाड येथून पर्यटनासाठी आला होता. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचा मृत्यू झाला. नेमीन नरेशभाई पटेल (वय २३) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचं नाव असून ही घटना रविवारी दुपारी घडली. माहिती मिळताच राजूर पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पर्यटकाच्या मदतीनं गडावरून डोली करुन पर्यटकाचा मृतदेह शिखराच्या पायथ्याशी आणण्यात आले. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. घटनेवर राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप डगळे, काळे आणि अशोक गाडे तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.