ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून हवालामार्गे पैसा ; 42 लाखांची रोकड जप्त, दोघांना ठोकल्या बेड्या

गुजरातमधून आलेली 42 लाख रुपयाची हवालाची रोकड अहिल्यानगर पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी गुजरातमधील दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

Assembly Election 2024
संग्रहित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2024, 8:14 AM IST

अहिल्यानगर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमधून हवालामार्गे पैसा आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर पोलिसांनी गुजरातमधील दोन भामट्य़ांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 42 लाखांची रोकड जप्त केली आहे. मुकेशकुमार रमेशभाई पटेल, धवलकुमार जसवंतभाई पटेल असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन भामट्यांची नावं असून ते गुजरातमधील गोठवा इथले आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.

Assembly Election 2024
संग्रहित छायाचित्र (Reporter)

गुजरातमधून हवालामार्गे पैसा पाठवला संगमनेर शहरात : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलीस आता सतर्क झाले आहेत. संगमनेर शहरातील पार्श्वथान गल्लीत 42 लाख 15 हजार रुपयांची रोख रक्कमेसह पोलिसांनी गुजरात राज्यातील दोघांना ताब्यात घेतलं आहे. संगमनेर शहरातील पार्श्वथान गल्लीत लाखो रुपये बेकायदेशीर येणार असल्याची माहिती अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथक तयार केले आणि संगमनेर इथं सापळा रचला. त्यानंतर काही साध्या वेशात तर काही वर्दीवर असणार्‍या पोलिसांना पार्श्वथान गल्लीतील सहदेव ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर दोन व्यक्तींना काही बॅगासह 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ताब्यात घेतलं.

पोलिसांनी 42 लाखाची रोकड केली जप्त : पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गुजरातमधील गोठवा इथल्या मुकेशकुमार रमेशभाई पटेल, धवलकुमार जसवंतभाई पटेल यांच्याकडं असलेल्या बॅगची तपासणी केली. या बॅगमध्ये तब्बल 42 लाख 15 हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली. ही रक्कम हवाल्याची असून याचा मालक हा संगमनेर इथला भावेश रामाभाई पटेल आणि अहिल्यानगर इथला आशिष सुभाष वर्मा हे दोघं असल्याचं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांनी सांगितलं. "पोलिसांनी याप्रकरणात संशयित असणार्‍यांना ताब्यात घेतलं आहे. ही रक्कम कुठून आली, त्याचा मालक आणखी कोण आहे. या गावात आणखी किती वेळा हवाला झाला आहे. 42 लाख 15 हजार रुपयाचा काय विनियोग होणार होता. याचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत," अशी माहिती अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. कराडमध्ये शस्त्राच्या धाकाने हवालाची पाच कोटींची रक्कम लुटली, संशयितांची धरपकड सुरू
  2. छत्रपती संभाजीनगरमध्ये हवालामार्गे जाणारे ३९ लाख रुपये जप्त, रक्कम कुठून आली? - Model code of conduct
  3. रत्नागिरीतील व्यक्तीला 97 लाख रुपयांसह राजस्थानमध्ये अटक, हवालाची रक्काम असल्याचा अंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.