साईंचं बोलावणं आलं तर युवराजही साईबाबांच्या दर्शनासाठी येणार; शिर्डीत आल्यावर काय म्हणाली युवराजची आई? - Shabnam Singh - SHABNAM SINGH
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 8, 2024, 10:47 PM IST
शिर्डी Shabnam Singh : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची आई शबनम सिंग यांनी आज शिर्डीत येवून साई मंदिरात जावून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी शबनम यांनी साईबाबांच्या दुपारचा माध्यहन आरतीलाही हजेरी लावली. साईबाबांच्या दर्शनानंतर मंदिर परिसरातील देणगी कार्यलायत जावून शबनम यांनी संस्थांनाला देणगीही दिली. दरम्यान साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शबनम यांचा साईबाबा मुर्ती व शॉल देवून सत्कार केला. परिवारातील सर्वांच्या सुख शांतीसाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली. साईबाबा न मागताच सर्वकाही मनोकामना पूर्ण करतात. साईबाबांचं दर्शन घेवून मनाला शांती आणि समाधान मिळत असल्याचं शबनम सिंग साईबाबा दर्शनानंतर 'ई टीव्ही भारत'शी बोलतांना म्हणल्या. जगातील एक नंबरची भारतीय टीम आहे. युरावज सिंग भारतात आला आहे. साईबाबांचं बोलावणं आल्यावर युवराजला पण साईबाबांच्या दर्शनासाठी घेवून येणार असल्याचं शबनम म्हणाल्या.