धावत्या दुचाकीवर रिल काढणं पडलं महागात; एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी - Beed Accident - BEED ACCIDENT
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 6, 2024, 1:59 PM IST
बीड Beed Accident News : काही दिवसांपूर्वी रिल्स काढण्याच्या नादात एका 23 वर्षीय तरुणीचा जीव गेल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात घडली. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळालं होतं. ही घटना ताजी असतानाच आता बीडमध्येही अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवताना अपघात होवून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झालाय. सदरील घटना ही धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली. या अपघाताची दृश्यं त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडिओत कैद झाली असून फोनकडं बघताना हा अपघात घडल्याचं यातून स्पष्ट दिसतय. जखमी तरुणावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.