वारकऱ्यांची मेट्रो वारी ! पिंपरी मेट्रोत 'जय जय राम कृष्ण हरी'चा जयघोष - Pimpri Metro Travel
🎬 Watch Now: Feature Video
पुणे Pimpri Metro Travel : संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात दाखल झाली आहे. वारी मार्गावरुन लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात चालताना दिसत आहेत. अवघ्या पंचक्रोशीत चोहीकडं हरिनामाचा गजर सुरू आहे. ठिकठिकाणी भजन, कीर्तनाचे कार्यक्रम सुरू आहेत. एकादशीच्या दिवशी राज्यभरातून आलेले पालखी सोहळे, दिंड्या, भाविक दिवसभर नगरप्रदक्षिणा करत असल्याचे दिसून आले. यावेळी पिंपरी येथून प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची अलोट गर्दी झाली होती. माऊली... माऊली... पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम...निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम... ज्ञानोबा तुकोबा एकोबा... असा जयघोष ठिकठिकाणी ऐकू येत आहे. डोक्यावर तुळशी घेतलेल्या महिला, गळ्यात वीणा, टाळ, पखवाज अडकवलेले भाविक सर्वत्र दिसत आहेत. सर्वांच्या मुखात हरिनाम होते. परिसरातील वातावरण भक्तिमय झालं होतं.
वारकऱ्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोत बसून भजनावर ठेका धरला होता. मेट्रो स्टेशन वारकऱ्यांनी गजबजलं होतं. दरम्यान यंदा वारी हायटेक झाली आहे. त्यासोबत वारकरी देखील हायटेक झाल्याचं बघायला मिळालं. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही पिंपरी संत तुकाराम नगर येथे वारकरी बंधूंना अल्पोहार आणि वारकरी बंधूंना मेट्रो सफर घडविण्याचं काम यांच्या हातून घडलं.