आज जर निर्णय चुकला तर सुप्रीम कोर्टात जाता येईल; शेवटी जनता निर्णय घेईलच - उल्हास बापट - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 3:40 PM IST

पुणे Ulhas Bapat on NCP Hearing : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज निकाल देण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आजपर्यंतची मुदतवाढ दिली होती. आजच्या सुनवणीवर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले की, "आपल्या देशात आपण संसदीय पद्धत इंग्लंड मधून घेतलीय. विधानसभा अध्यक्ष हे अंपायर सारखे काम करतात. पण आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष म्हणजे पक्षाचा सदस्य असतो आणि त्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा खूप कमी आहे. त्या अध्यक्षाने पक्ष बदलले असतील तर न्यायाची अपेक्षा आणखी कमी असते. आता अध्यक्षांची विश्वासाहर्ता कमी होत चाललीय. आज जर निर्णय चुकला तर सुप्रीम कोर्टात जाता येईल. तसंच शेवटी अंतिम निर्णय भारताची जनता घेणार आहे. निवडणूक आयोगाच्या आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाता येणार आहे. तसंच व्हीप बाबत मूळ पक्षाकडे जो व्हीप आहे तोच लागू होईल." 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.