जालन्यात शाळकरी मुलाचा अपहरणाचा थरार; गृहमंत्र्यांचा एक फोन अन् मुलाची आठ तासात सुटका - School Boy Kidnapping

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 3:52 PM IST

thumbnail
अजयकुमार बन्सल, पोलीस अधिक्षक, जालना (ETV Bharat Reporter)

जालना School Boy Kidnapping : जालनाकरांना एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा थरार अनुभवायला मिळाला. हा मुलगा नेहमी प्रमाणे सायकलवर शाळेत जात होता. यादरम्यान सकाळी 8 वाजता ओमनी गाडीत आलेल्या तिघांनी त्याला अडवलं आणि गाडीत टाकून घेवून गेले. दोन तासांनंतर किडनॅपरनं मुलाच्या वडिलांना फोन केला आणि पाच कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर शाळकरी मुलाच्या वडिलांनी वेळ न दडवता सगळी हकिकत आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डाॅ ओमप्रकाश शेटे यांना फोनवर सांगितली. त्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एसपींना सूचना दिल्या आणि पोलिसांची चक्रे फिरली. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही खंगाळत आरोपींचा शोध घेत फक्त आठ तासांच्या आत अपहृत मुलाची सुटका केली आणि तीनही आरोपी जेरबंद केले आहेत. रोहित राजा भुरेवाल, अरबाज अकबर शेख आणि वरुण नितीन शर्मा अशी या तिन्ही आरोपींची नावं असून ते त्यांच्या गल्लीतच राहत होते. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.