ठाण्याजवळ नवीन रेल्वे स्थानक होणार, कामाला मिळणार गती; वाचा कधीपर्यंत होणार प्रवाशांसाठी खुलं?

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 10:08 AM IST

ठाणे Thane New Railway Station : मुंबईनंतर उपनगरीय रेल्वे स्थानकांमधील सर्वाधिक गर्दीचं स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानक गणलं जातं. या रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे 7 ते 8 लाख प्रवासी ये-जा करतात. त्यातच हे रेल्वे स्थानक जुनं झाल्यानं प्रवाशांचा वाढता भार ठाणे रेल्वे स्थानक पेलू शकत नसल्यानं नवीन रेल्वे स्थानकाची आवश्यकता होती. यामुळं ठाणे ते मुलुंड दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाचं काम सुरू आहे. या कामाची खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान खासदार राजन विचारे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्या. जेणेकरून ठाणे महापालिकेकडे स्मार्ट सिटी अंतर्गत उपलब्ध असलेला निधी रेल्वेला रक्कम भरुन स्थानकाच्या इमारतीचं आणि रुळाचं काम सुरू करता येऊ शकेल. तसंच सध्या या स्थानकाचं काम 35 टक्के पूर्ण झालंय. तर डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण होऊन नवं रेल्वे स्थानक प्रवाश्यांसाठी खुलं करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे यांना दिलीय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.