बीडकरांची चिंता वाढली; स्वाईन फ्लूमुळे एकाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी - Swine Flu News - SWINE FLU NEWS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 2, 2024, 8:16 PM IST
बीड- जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथे स्वाइन फ्लूनं एकाचा मृत्यू झाला आहे. रावसाहेब रामचंद्र चाटे (65) असं मयत व्यक्तीचं नाव आहे. या रुग्णावर अंबाजोगाईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. पंढरपूरची वारी करून आल्यानंतर आजारी पडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लक्षणे पाहता डॉक्टरांनी त्यांचे नमुने घेत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. 1 ऑगस्ट रोजी नमुन्याचा रिपोर्ट आरोग्य विभागाला मिळाला. त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. गावात स्वाइन फ्लूची कोणाला लक्षणे आहेत का? याची माहिती घेतली जात आहे, अशी महिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लोमटे यांनी दिली.