सुप्रिया सुळेंना आज्जीचा स्वॅग; म्हणाल्या, "इकडं जायचं आणि तिकडं पळायचं असं करू नका"; पाहा व्हिडिओ - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 15, 2024, 9:35 PM IST
पुणे Supriya Sule Video : राज्य नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध मतदारसंघात नागरिकांच्या गाठीभेटी घेणे तसेच प्रचार रॅली या दोन्ही उमेदवारांकडून सुरू आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भोर तालुक्याच्या दाैऱ्यादरम्यान त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी पानवळ या गावातील भागूबाई विठ्ठल कोंढाळकर या आजीबाईंनी 'भारत वाचवा' असं आवाहन करत लोकशाहीच्या रक्षणाचं महत्त्व सांगितलं. 'आपण मराठी आहोत, कष्ट करू पण भारत वाचवू' असं सांगत त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना खडे बोल देखील सुनावले. काम करून भोर तालुक्याचे नाव मोठे करा, असा आशीर्वाद त्यांनी सुप्रिया सुळे यांना यावेळी दिला. पाहूया.