हैदराबाद : भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोच्या पहिल्या दिवशी, टोयोटाच्या बहुप्रतिक्षित टोयोटा अर्बन क्रूझर ईव्हीचा पहिला लूक समोर आलाय. ही टोयोटा ईव्ही लवकरच भारतात लाँच केली जाईल. इडिया मोबिलिटी एक्स्पोमध्ये प्रदर्शित होणारी टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही, मारुती विटारा इलेक्ट्रिक नंतर भारतात लाँच केली जाईल. ही ईव्ही अनेक आधुनिक वैशिष्ट्यांसह येते.
टोयोटा अर्बन क्रूझर ईव्हीची वैशिष्ट्ये
भारतात मारुती विटारा इलेक्ट्रिक लाँच झाल्यानंतरच टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही भारतीय बाजारात लाँच केलं जाईल. या कारमध्ये नवीन डिझाइन केलेले एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, हेडलॅम्प आणि अलॉय व्हील्स सारखी वैशिष्ट्ये आहेत. यासह, तुम्हाला कारमध्ये कनेक्टेड ॲप, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, सनरूफ आणि जेबीएल साउंड सिस्टम मिळेल. सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर, अर्बन क्रूझर इलेक्ट्रिकमध्ये 360-डिग्री कॅमेरा आणि ADAS वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या ADAS सूटमध्ये अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर अलर्ट आणि लेन-कीप असिस्ट समाविष्ट आहेत.
टोयोटा अर्बन क्रूझर EV ची पॉवरट्रेन
टोयोटा अर्बन क्रूझर EV ही मारुती सुझुकी ई-विटारा सारख्या दोन पॉवरट्रेन कॉन्फिगरेशनसह ऑफर केली जाते. ही SUV 49kWh आणि 61 kWh लिथियम-आयरन-फॉस्फेट सेल्सच्या बॅटरी पॅक पर्यायांसह उपलब्ध असेल. लहान बॅटरीसह फ्रंट एक्सल-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर 144hp पॉवर आणि 189Nm टॉर्क जनरेट करेल, तर मोठ्या बॅटरीसह व्हेरिएंटची मोटर 174hp पॉवर आणि 189Nm टॉर्क जनरेट करेल.
कुठं होणार उत्पादन
टोयोटा अर्बन बीईव्हीचं भारतातील हे पहिलेच सार्वजनिक प्रदर्शन आहे. या वाहनाच्या उत्पादनाची आवृत्ती केवळ मारुती सुझुकीच्या गुजरात प्लांटमध्ये होणार आहे. मारुती सुझुकी विटारा प्रमाणेच, टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही हे जागतिक उत्पादन असण्याची आणि जपान, युरोप आणि इतर बाजारपेठांमध्ये लाँच होण्याची दाट शक्यता आहे.
हे वाचलंत का :